शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
6
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
7
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
8
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
9
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
10
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
11
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
14
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
15
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
17
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
18
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
19
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
20
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग

स्तनपानाविषयी जनजागृतीसाठी गर्भवतींना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:56 IST

खारघरमध्ये शिबिर : तज्ज्ञ डॉक्टरांनी साधला संवाद; ५० जोडप्यांचा सहभाग

पनवेल : गरोदरपणात स्त्रियांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या समस्या, या दिवसांमध्ये घ्यावयाची काळजी तसेच स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खारघर येथील मदरहूड रुग्णालयाच्या वतीने रविवारी पनवेल येथे ‘लिटिल थिंग्स अबाउट प्रेग्नेन्सी’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात जवळपास ५० जोडप्यांना मोफत मार्गदर्शन करण्यात आले.

आजकालच्या सुशिक्षित व उच्चभ्रू शहरी भागातील मातांच्या मनात नवजात शिशूला स्तनपान देताना गैरसमज असतात; परंतु स्तनपान दिल्याने बाळाला तर फायदा होतोच; पण स्तनदा मातेलाही खूप फायदे होतात. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी १ ते ७ आॅगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यानुषंगाने भावी आईबाबांना स्तनपानाविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरांतर्गत गर्भधारणेचे विविध पैलू, बाळंतपणा आणि पालकत्व अशा विविध विषयांवर चर्चात्मक संवाद साधण्यात आला. या वेळी आहारतज्ज्ञांकडून गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन करण्यात आले असून सकस आहार, फिटनेस, गरोदरपणातील फॅशन, लेबर मॅनेजमेंट आदी विषयांवरही संवाद साधण्यात आला.शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच प्रसूतिशास्त्रज्ञ डॉ. अनु वीज, डॉ. सपना चौधरी, डॉ. सुरभी सिद्धार्थ, फेटल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे, आहारतज्ज्ञ मानसी जानी, अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट डॉ. अनिता रॉय यांनी गर्भारपणातील विविध स्थितींची माहिती दिली.आई होताना घ्यावयाची काळजी, बाळाची वाढ योग्यरीत्या होत आहे की नाही, याकरिता वेळोवेळी चाचणी, व्यायामाची जोड, पेनलेस डिलिव्हरी संबंधी समज गैरसमज, बाबा होताना येणारी महत्त्वाच्या जबाबदारी आदी विषयांवर भावी आईबाबांना मार्गदर्शन करण्यात आले.गर्भारपणात स्त्री अनेक मानसिक व शारीरिक बदलातून जात असते. गर्भाच्या विविध अवयवांची वाढदेखील याच काळात होत असल्याने गरोदर स्त्रीने स्वत:ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. भावी आईला स्तनपानाविषयचे फायदे पटवून देण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार यांनी दिली. 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई