शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागातील समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराला पसंती

By admin | Updated: May 9, 2017 01:31 IST

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग १७ मध्ये मुख्य लढत भाजपा, शेकापक्ष व राष्ट्रवादीत होणार आहे. भाजपाने या मतदारसंघात

नितीन देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग १७ मध्ये मुख्य लढत भाजपा, शेकापक्ष व राष्ट्रवादीत होणार आहे. भाजपाने या मतदारसंघात दोन वकिलांना उमेदवारी दिली आहे. शेकापक्षाने अनुभवी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील व मीरा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांसोबत मैदानात उतरवले आहेत. सिडकोच्या ताब्यात असलेल्या या प्रभागात पाणी, कचरा, पार्किंग व रस्त्याची समस्या गंभीर आहे. या समस्या सोडवणाऱ्या उमेदवाराला मतदारांकडून पसंती मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग १७ हा बहुतांश नवीन पनवेलमध्ये आहे. या प्रभागात २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २८,५१० आणि मतदारांची संख्या २८,७५० आहेत. याविरोधात अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी निवडणूक आयोगाकडे तक्र ार केली होती. सिडकोच्या हद्दीतील सेक्टर १२ ते १५ ए ,१७ ते १९, भुजबळ वाडी व पोदी अडीच हा भाग येतो. रेल्वे लाइनच्या पश्चिमेकडील एस.टी. स्टँडमागील लोकमान्य नगर, के. मॉलच्या मागच्या बाजूचा परिसर, तक्का व रेल्वे कॉलनी असा लांबवर पसरला आहे. यामध्ये पंचशील नगर, माल धक्का, लोकमान्य नगर, इंदिरा नगर व आझाद नगरचा भागही येतो. त्यामुळे या मतदार संघात मिश्र वस्ती आहे. या प्रभागात सिडको हद्दीत येणाऱ्या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. पण तक्का परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी मिळवली आहे. भुजबळ यांनी सिडकोच्या अधीक्षक अभियंत्यांना आणून वाहनतळासाठी नवीन जागा उपलब्ध करण्याबाबत पाहणी केली होती व विसपुते वसतिगृहाजवळ जागा उपलब्ध करून देण्यास मदत केली होती. भाजपाने प्रभाग १७ मध्ये सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी मनोज भुजबळ व वृषाली वाघमारे या वकिलांना संधी दिली आहे. या मतदार संघात असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल, असे येथील नागरिकांना वाटते.