शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याला प्राधान्य  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 01:37 IST

लॉकडाऊनमुळे कामगारांची गावाकडे धाव : रेल्वे, बस स्थानकात गर्दी 

 

लोकमत न्यूज नेटवर्क कळंबाेली : लॉकडाऊनमुळे पनवेल परिसरातील उद्योगधंदे, बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. परिणामी हाताला काम नसल्यामुळे कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुकाने त्याचबरोबर इतर काम बंद झाले आहे. काम-धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांकडून पसंती देण्यात येत असल्याने रेल्वे, बसस्थानकांतील गर्दी वाढली आहे. गत वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. तेव्हा सर्व राज्यासह परराज्यातील वाहतूक सुविधा बंद करण्यात आली  होती. त्यामुळे कामगार वर्ग आपल्या मूळ गावी परतू शकले नाहीत. काहींनी मिळेल ते वाहन पकडून गाव गाठले.  तर काहींनी पायीच गावची वाट धरल्याचे पहायला मिळाले. शहरात राहिलेल्या  कामगारांवर उपासमारीची वेळ ओढावली होती. जवळ असलेली सर्व जमापुंजी संपल्याने पनवेल परिसरात राहून दिवस काढणे मुश्कील झाले होते. उद्योग- धंद्यावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सद्य:परिस्थितीत बिकट बनला आहे. गत वर्षाप्रमाणे यंदाही तीच  परिस्थिती  उद्भवेल या भीतीने कामगार, गरीब मजुरांनी गावी जाण्यासाठी पनवेल शहरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पनवेल रेल्वेस्थानक, बसस्थानकात गावी जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी कली आहे. शुक्रवारी तर मोठ्या प्रमाणात रेल्वेस्थानकावर गर्दी उसळली होती. दररोज गावी जाणाऱ्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, घाटमाथ्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा एमआयडीसी वसाहत, शिळ फाटा परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर गावाकडे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात येत आहेत. यात गोरखपूरला जाणा-या मजुरांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात  घाटमाथ्यावरील लातूर, पुणे, नगर, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ, बुलडाणा येथे जाणारे प्रवासी गर्दी करत आहेत. परप्रांतीय बांधव आपल्या कुटुंबासोबत परत गावी जात आहेत. यात  पनवेलहून तर काही ठाणे, मुंबई येथून गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकात गर्दी करत आहेत. 

उरण येथे फळ गाड्यावर काम करतो. आता लॉकडाऊनमुळे सर्व बंद करण्यात आले आहे. पुढे आणखी लॉकडाऊन वाढेल याची भीती वाटते आहे. त्यामुळे आता गोरखपूरला  जात आहे.  कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पनवेलला परत येईन.-सुनील यादव, प्रवासी गत वर्षी लॉकडाऊन लागले तेव्हा तळोजा येथे राहण्यास होतो. पण खाण्या-पिण्याचे खूप हाल झाले. उपाशीपोटी काही दिवस झोपलो, तेव्हा जमा झालेला पैसा देखील  संपला होता. परिस्थिती खूप वाईट आली  होती. ती आता येऊ नये या करिता आगोदरच सावध झालेले बरं म्हणून गावी निघालो आहे.  - अनिल राठोड, प्रवासी गत वर्षीच्या लॉकडाऊनमुळे खूप हाल झाले. जाण्यासाठी गाड्या नव्हत्या आणि इतर वाहनाने जाण्यास अव्वाच्या सव्वा पैसे घेतले होते.  तेही महाराष्ट्र सीमेपर्यंत यंदा गाड्या सुरू आहेत. म्हणून लॉकडाऊन पुन्हा वाढण्याअगोदर गाव गाठतो आहे. - संजय जयस्वाल, प्रवासी