शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या मंडपापुढे नमाज अदा

By admin | Updated: September 14, 2016 04:46 IST

सर्वधर्म समभावनेचा संदेश देत कोपरखैरणे येथे गणेशोत्सव मंडळापुढे ईदचा नमाज पठण करण्यात आले. विभागात एकमेव मैदान त्याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे

नवी मुंबई : सर्वधर्म समभावनेचा संदेश देत कोपरखैरणे येथे गणेशोत्सव मंडळापुढे ईदचा नमाज पठण करण्यात आले. विभागात एकमेव मैदान त्याठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे विभागातील मुस्लीम धर्मियांच्या नागरीकांची नमाज पठणात गैरसोयी होऊ नये, याकरिता ही संकल्पना राबवण्यात आली.कोपरखैरणे सेक्टर १० परिसरात एकमेव मैदान असून, त्याठिकाणी सर्वधर्मियांचे कार्यक्रम होत असतात. या मैदानावर सध्या श्रीगणरायाची स्थापना करण्यात आलेली आहे. सुमारे १९९५ पासून हे मैदान नवरात्री, गणेशोत्सवासाठी तसेच नमाज अदा करण्यासाठी वापरले जात आहे. यंदाही गणेशोत्सात काळातच ईद आल्यामुळे विभागातील मुस्लीम धर्मियांपुढे नमाज पठनासाठी जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. गणेशोत्सवानिमित्त त्याठिकाणी विविध मराठमोळे कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यामुळे नमाजासाठी मुस्लीम धर्मियांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यावर पर्याय म्हणून कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व मुस्लीम धर्मियांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेतली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईक, मौलाना मोहम्मद जुलकरेमम शेख, अहमत फिरफिरे, अब्दुल खान यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार गणेशोत्सव मंडळाबाहेर ईदचे नमाज पठन करण्यात आले. तर कोपरखैरणे पोलीस व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांनी हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्माच्या नागरीकांना सर्व धर्म समभावनेचा संदेश दिला. (प्रतिनिधी)