शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवासात हृदयाचा झटका आलेल्या तरुणाचे वाचविले प्राण

By admin | Updated: April 21, 2017 00:32 IST

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सने उड्डाण घेतल्यानंतर तीस मिनिटांनी विमानातील ३० वर्षीय

प्राची सोनवणे,  नवी मुंबईछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सने उड्डाण घेतल्यानंतर तीस मिनिटांनी विमानातील ३० वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. या विमानातून प्रवास करणाऱ्या नवी मुंबईतील दोन डॉक्टरांना या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी पुढे सरसावले आणि विमानातील प्रथमोपचार पेटीचा वापर करत प्रसंगावधान राखून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. तत्काळ आणि अचूक उपचार मिळाल्याने या तरुणाचे प्राण बचावले. नवी मुंबई येथे राहणारे जनरल सर्जन डॉ. प्रशांत शेंडगे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. राजपाल उसनाळे हे दोघेही कुटुंबीयांसोबत तिरुपतीला चालले होते. मुंबईहून त्यांच्या विमानाचे उड्डाण होताच अर्ध्या तासाने एक अत्यावश्यक घोषणा करण्यात आली. यामध्ये एका सहप्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच या दोघांनीही त्या रुग्णाच्या मदतीकरिता धाव घेतली. छातीत असह्य वेदना, घाम फुटणे अशी लक्षणे पाहता लगेगच त्या तरुणाला आॅक्सिजन पुरवत, विमानातील इर्मजन्सी किटचा वापर करण्यात आला तसेच जवळ असलेली औषधे, ग्लुकोज पाणी देण्यात आले. तरुणाने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील दहा मिनिटांमध्ये त्याच्या स्वास्थ्यात सुधार झाल्याची माहिती डॉ. प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. चेन्नईला पोहोचताच तत्काळ रुग्णवाहिका बोलवून या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तासाभरात त्या तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने मानसिक समाधान मिळाल्याची माहिती डॉ. राजपाल उसनाळे यांनी दिली. तत्काळ उपचार न मिळाल्यास जीवही गमवावा लागला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. तरुणाला याआधीही अशा प्रकारचा त्रास झाल्याचे उघडकीस आले. झालेल्या प्रकाराविषयी बोलताना डॉ. शेंडगे यांनी याआधी त्यांच्या रुग्णालयातील प्रसंगाविषयी माहिती दिली. रात्री साडेअकराच्या सुमारास एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र वेळेवर उपचार न घेतल्याने, दुर्लक्ष केल्याने रुग्णालयात पोहोचेपर्यंत या रुग्णाला प्राण गमवावा लागल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले.