शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील वीजपुरवठा सुरळीत; वादळामुळे झाले होते नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:32 IST

महावितरणकडून ग्रामीण भागातील १00 टक्के कामे पूर्ण

- मयूर तांबडे नवीन पनवेल : चक्रीवादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान केले होते. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने शेकडो खांब खाली कोसळले आणि त्यामुळे अनेकांना अंधारात राहावे लागले होते. अखेर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शहरी आणि ग्रामीण भागातील खंडित झालेला १00 टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.चक्रीवादळामुळे पनवेल शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ येण्यापूर्वीच महावितरणने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरातील वीजपुरवठा बंद केला होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाºयामुळे अनेक ठिकाणांचे विद्युत खांब कोलमडून पडले होते, तर काही भागांतील विजेच्या तारा तुटल्या होत्या. विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी विजेचे खांब खांद्यावरून वाहून न्यावे लागले. महापालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कामोठे येथील शहरी भागांतील वीजपुरवठा २४ तासांच्या आत सुरू करण्यात आला होता. मात्र, ग्रामीण भागात वीज सुरू करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. अनेक ठिकाणी दुर्गम, तसेच जंगली भाग असल्याने विजेच्या खांबांची वाहतूक करण्यासाठीही कसरत करावी लागली.तालुक्यांमध्ये रस्त्याला लागून असणारे आणि गावाच्या ठिकाणी असणारे विजेचे खांब कोसळून खाली पडले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी खांब पडले, तेथे ते उभारण्याकडे महावितरणच्या अधिकाºयांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. चक्रीवादळानंतर विजेचे किती खांब पडले, याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये खांबांची संख्या शेकडोंच्या घरात होती. खांब उभे करण्यासाठी पडलेल्या झाडांचा मोठा अडथळा होता. ही झाडे हटविण्यासाठी स्थानिक गावकºयांनी कर्मचाºयांना मदत केली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे वीजपुरवठा १00 टक्के पूर्ववत झाल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी सांगितले. टावरवाडी, मालडुंगे, शिवणसई, दुंदरे पाडा, धोदानी, तसेच आदिवासी वाड्यांवर काही ठिकाणी खांद्यावरून पोल, विजेच्या तारा वगैरे साहित्य वाहून न्यावे लागले. महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता आर. बी. माने, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, मिलिंद सूर्यतळ, जयदीप नानोटे, विवेक स्वामी यांच्यासह अनेक कनिष्ठ अभियंत्यांनी ही मोहीम यशस्वी केली.कोसळलेले अडीचशे खांब पुन्हा उभारले‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणांचे डीपी बॉक्स कोलमडून पडले होते. उच्च दाबाच्या वाहिन्या, लघू दाबाच्या वाहिन्या, विजेचे खांब पडल्याने महावितरणचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.खंडित झालेला हा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या शंभरपेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेतले. पनवेल परिसरात जवळपास अडीचशेहून अधिक विजेचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले.खारघर, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल येथील वीज चोवीस तासांच्या आत आली, तर गव्हाण, पारगाव, तळोजे, नेरे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणला ४८ तास लागले.शहरी भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर, खारघर, कलंबोली आणि शहर येथील अभियंत्यांनी ग्रामीण भागांत (गाव, वाडी, पाडे) जाऊन काम केले.

टॅग्स :electricityवीज