शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर खड्ड्यांच्या पायघड्या

By admin | Updated: September 3, 2016 02:47 IST

बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर

- कमलाकर कांबळे, नवी मुंबई

बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेची राज्याच्या नगरविकास विभागाने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधांचा गवगवा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहनधारकांना तर अक्षरश: कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्यांच्या दुरवस्थेचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत ही उमटले होते. तसेच विविध सामाजिक संस्था व दक्ष नागरिकांनी यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाने या तक्रारींना केराची टोपली दाखविली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. परंतु तेही तकलादू स्वरूपाचे ठरले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत खड्ड्यांच्या पायघड्यांनी करण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे. सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलासह त्याच्या खालून वसाहतीकडे जाणारे रस्ते पूर्णत: उखडले आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलाच्या कूर्मगती कामाचा फटका वाहतुकीला बसला आहे. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत रस्त्यांचीही दैना उडाली आहे. यापूर्वी उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची युध्दपातळीवर डागडुजी करण्याची प्रथा होती. परंतु विद्यमान प्रशासनाने यावर्षी ही प्रथा मोडीत काढल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गणेशभक्तांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे.नगरसेविकेच्या तक्रारीला केराची टोपलीमहापालिका आणि सिडकोच्या वादात घणसोलीतील विकासकामांना खीळ बसली आहे. येथील बहुतांशी रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रभाग क्रमांक ३३ च्या नगरसेविका उषा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सिडको व महापालिका प्रशासनाला निवेदन देवून गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली होती. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे उत्सव काळात काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या दोन्ही प्राधिकरणांची राहील, असे त्यांनी या निवेदनात नमूद केले होते. परंतु दोन्ही प्राधिकरणांनी या निवेदनालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे.राज्य शासनाने घेतली दखलशहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वाशी येथील एक जागरूक नागरिक भरत सामंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल नगरविकास विभागाने घेतली आहे. यासंदर्भातील मुद्देनिहाय तपशील तातडीने सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत.