शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:54 IST

पाण्याची पातळी ८७.५0 मीटर; नदीपात्राकडील गावांनाही दिला इशारा

नवी मुंबई : धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मोरबे धरणाची पातळी ८७.५० मिटरपर्यंत वाढली आहे. कोणत्याही क्षणी धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली असून नदी पात्राच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी पात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने खालापूर तालुक्यामधील मोरबे धरण विकत घेतले आहे. धरणामध्ये ८८ मिटर पर्यंत पाणी साठा करता येतो. पावसाळा सुरू होण्यापुर्वी धरणातील पातळी ७० मिटरपेक्षा खाली आली होती. परंतु जुन अखेरपासून धरण परिसरात नियमीत पाऊस सुरू झाला असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढू लागली आहे. शनिवारी पहाटेपर्यंत २९३४ मी. मी. एवढा पाऊस धरणाच्या परिसरात पडला होता. सकाळी पाण्याची पातळी ८६.८० मीटर एवढी झाली होती. सायंकाळी हे प्रमाण ८७.५० मीटरपर्यंत वाढले होते. रविवारी धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण विभागाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी याविषयी रायगडचे जिल्हाअधीकारी यांना पत्र देवून धरणातील पाणी साठ्याची माहिती दिली आहे. धरण लवकरच भरणार असून दोन वक्राकार दरवाजे उघडावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोरबे धरणाचे दरवाजे उघडून धारवी नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडून दिले जाणार आहे. यामुळे नदीच्या काठावरील गावांमधील नागरिकांनी नदी पात्रामध्ये जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.धरणातील पाणी साठा वाढल्यामुळे नवी मुंबईकरांचा पुढील वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे. आॅगस्ट २०२० पर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध होवू शकते. महापालिकेने आठवड्यातून एक दिवस सायंकाळी पाणी कपात सुरू केली होती. तीही पंधरा दिवसांपुर्वीच बंद करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने लवकरच मोरबे धरण परिसरात जलपुजन करण्यात येणार आहे.शहरात मुसळधारनवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्येही दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. दिवसभरामध्ये २ वृक्ष कोसळण्याची घटना घडली आहे. एक घरही पावसामुळे पडले असून एक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली आहे.मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता आहे. याविषयी जिल्हाअधिकारी यांना माहिती देण्यात आली असून धरणाचे दरवाजे उघडून पाणी मुळ नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे.- मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, मोरबे धरण