शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकमुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:25 IST

वाशी-कोपरखैरणे मार्गावरील प्रकार : कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

नवी मुंबई : शहरात बेकायदा वाहन पार्किंगचा प्रश्न जटिल झाला आहे. जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वाशी-कोपरखैरणे मार्गावर स्वयंपाकघरात वापरावयाच्या गॅस सिलिंडर भरलेले ट्रक दुतर्फा पार्क केले जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सदर ट्रक व संबंधित एजन्सी मालकावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रदीप बी. वाघमारे यांनी केली आहे.

वाशी-कोपरखैरणे मार्गावर जुहूगाव येथील माता गावदेवी मंदिर शेजारी एच.पी. घरगुती गॅस सिलिंडर वितरण एजन्सी आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला एजन्सीचे गोदाम आहे. या गोदामात रिकामे व भरलेले गॅस सिलिंडर ठेवले जातात. त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर चोवीस तास गॅस सिलिंडर भरलेल्या ट्रकचा राबता दिसून येतो. गावाच्या चारी बाजूकडील रस्त्यांवर सिलिंडरने भरलेले ट्रक उभे केल्याचे दिसून येते. 

अनेकदा रस्त्यावरच ट्रक उभे करून सिलिंडर वितरणाचे काम केले जाते. समोरच असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारातसुध्दा गॅस सिलिंडरने भरलेले ट्रक उभे केले जातात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सिलिंडरने भरलेल्या ट्रकना रस्त्यावर पार्क करण्यास मज्जाव करावा तसेच संबंधित एजन्सी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदीप वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात आठ दिवसांपूर्वी लेखी तक्रारसुध्दा केली आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या संबंधित विभागाकडून या मागणीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.   

गॅस सिलिंडरचे वितरण करणाऱ्या संस्थेला सिलिंडर साठविण्यासाठी गरजेनुसार गोदामाची व्यवस्था करावी लागते. आगीचा धोका टाळण्यासाठी त्या ठिकाणी नियमानुसार अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणेसुध्दा बंधनकारक आहे. परंतु सदर एजन्सी मालकाने या सर्व नियमांना केराची टोपली दाखविल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.  नुकतेच मुंबई दोन ठिकाणी गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई