शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणाने डोंबिवलीकर गुदमरले

By admin | Updated: January 5, 2016 00:59 IST

सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली डोंबिवली आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

आकाश गायकवाड,  डोंबिवलीसांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली डोंबिवली आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. प्रदूषण करण्यात हे शहर देशात चौदावे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाने या बाबतीत निश्चित ठोस उपाययोजना करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र,गेल्या तीन वर्षांत डोंबिवलीत प्रदूषण कमी होण्याऐवजी ते वाढल्याचेच सिध्द झाल्याने प्रदूषण रोखण्यात नियंत्रण मंडळ कमी पडल्याचे दिसून येते. हिरवा पाऊस पडूनही परिस्थिती न सुधारल्याने सध्या तरी डोंबिवलीकरांचा जीव गुदमरतो आहे.डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील ४५० कारखान्यांपैकी २०० कारखाने रासायनिक उत्पादनाशी निगडीत आहेत. प्रक्रि या न करता कारखान्यातील सांडपाणी डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपन्यांतून सोडले जाते. त्यातून जलप्रदूषण तर होतेच, पण वायू प्रदूषणही होते. डोंबिवली शहर, ग्रामीण परिसर आणि औद्योगिक भागाला त्याचा फटका बसतो. या विरोधात नागरिकांनी अनेक तक्र ारी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्या. पण त्यांच्याकडून दिखाऊ कारवाई होते, असा नागरिकांचा आरोप आहे. ठोस उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा फायदा घेत अनेक कंपन्या रात्रीच्या वेळेत खुलेआम वायू सोडून देतात. त्यामुळे निवासी विभागातील आजदे गाव, सुदर्शननगर, मिलापनगर, सुदामानगर, घरडा सर्कल, सागर्ली-सागाव, गांधीनगर, टिळकनगर, गोग्रासवाडी, पांडुरंगवाडी, रामचंद्रनगर, पी अँड टी कॉलनी, नांदिवली आदी परिसरात राहणाऱ्यांचा जीव गुदमरतो. कासावीस होतो. दुर्गंधीयुक्त वायुमुळे श्वास घेणे, डोळे जळजळणे, उलट्या होणे, डोकेदुखी इत्यादी तक्र ारी वाढल्या. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शाळेतील शेकडो विद्यार्थ्यंांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारामुळे शाळा लवकर सोडून देण्याची वेळ आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. दुर्गंधीयुक्त वायूचा त्रास गेली अनेक वर्षे येथील हजारो रहिवासी अनुभवत आहेत. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जितेंद्र सांगेवार यांच्याकडे नागरिकांनी अनेकवेळा लेखी आणि फोनवर तक्र ारी केल्या. कारवाई करतो, उपाययोजना करतो, असे आश्वासन ते देतात, पण प्रत्यक्षात फरक पडत नाही, असेचे म्हणणे आहे. केमिकलचा उग्र वास सहन न झाल्याने अखेर नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्र ारही दाखल केली आहे. तरीही परिस्थिती तशीच असल्याचे म्हणणे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी मांडले. गांधीनगर येथील रहिवासी गिरिजा मराठे यांनीही डोंबिवलीच्या प्रदूषणाविरोधात आवाज उठवून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र तेथील अधिकारी कोणताही प्रदूषणाचा त्रास नसल्याचे सांगतात. आम्हालाच खोटे पाडले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी २०० ते ३०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्र ार केली. त्याचाही फायदा झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अधिकारी निगरगट्ट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.