शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना राजकारण्यांची भीती

By admin | Updated: November 18, 2015 01:19 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बेकायदेशीर होर्डिंगबाजी सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करत नाहीत

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवी मुंबईमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बेकायदेशीर होर्डिंगबाजी सुरूच आहे. महापालिकेचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करत नाहीत. नेत्यांचा प्रसिद्धीचा उद्देश सफल झाल्यानंतर स्वखर्चाने रोज हजारो रूपये खर्च करून होर्डिंग काढले जात आहेत. दिवाळीमध्ये महापालिकेच्या १११ प्रभागांमध्ये २ हजारपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग लावले होते. उच्च न्यायालयाने विनापरवाना होर्डिंग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पालिकेचे विभाग अधिकारी राजकीय पदाधिकाऱ्यांना घाबरत असल्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. अनधिकृत होर्डिंग काढल्यास नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांकडून दबाव येत आहे. या दबावाचे कारण देत प्रशासन कारवाई टाळत आहे. अतिक्रमण विरोधी पथकामधील कर्मचारीही नगरसेवक व राजकीय पक्षांशी जवळीक असणारे असल्यामुळे ते सण, उत्सव व वाढदिवसाचे अनधिकृत होर्डिंग काढत नाहीत. दबदबा असणाऱ्या नेत्यांच्या होर्डिंगला हातही लावला जात नसून सामान्य कार्यकर्त्यांचे होर्डिंग हटविले जात आहेत. अनधिकृत होर्डिंगविरोधात तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. उच्च न्यायालयाचा अवमान झाला तरी चालेल परंतु लोकप्रतिनिधींचा कोप नको अशी भावना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे महापालिकेचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. होर्डिंग लावल्यानंतर कारवाई होत नाही. परंतु नेत्यांचा प्रसिद्धीचा उद्देश साध्य झाल्यानंतर पालिका स्वखर्चाने सर्व होर्डिंग काढून घेवून जात आहे. यासाठी रोज हजारो रूपये खर्च केले जात असून याविषयी दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)