शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये राजकीय घडामोडींना वेग

By admin | Updated: September 23, 2016 03:25 IST

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल आणि त्यांची सून चित्रलेखा या दोघांची नावे अलिबाग नगर पालिका क्षेत्रातील मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत.

आविष्कार देसाई , अलिबागशेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचा मुलगा नृपाल आणि त्यांची सून चित्रलेखा या दोघांची नावे अलिबाग नगर पालिका क्षेत्रातील मतदार यादीत नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे आमदार पाटील यांनी दोघांनाही शहरातील राजकारणात सक्रिय केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. असे असले तरी दोघांनाही प्रशांत नाईक यांच्या पॉलिटिकल मायलेजवर स्वार होऊन राजकीय उंची गाठावी लागणार ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शेकापच्या या निर्णयाने राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे.अलिबाग नगर पालिकेवर शेकापची एक हाती सत्ता आहे. १७ पैकी १६ नगरसेवक हे शेकापचे आहेत, तर एक नगरसवेक हा काँग्रेसचा आहे. नगराध्यक्षपदाची धुरा प्रशांत नाईक यांच्याकडे आहे. प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या त्यात्या वेळी नाईक यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविला आहे. अलिबाग नगर पालिका आणि प्रशांत नाईक हे समीकरण कायम आहे. नाईक यांच्या पत्नी नमिता नाईक यांचीही नगराध्यक्षपदाची कारकीर्द उल्लेखनीय राहिली होती. दूरदृष्टीचे बरचसे निर्णय हे त्यांच्याच कार्यकाळात घेतले गेले होते.नाईक हे अलिबागचा कारभार सांभाळत असताना त्यांच्या सोबतीला आता नगर पालिका हद्दीत नृपाल पाटील आणि चित्रलेखा पाटील यांना उतरविण्यात आले आहे. काहीच दिवसांपूर्वी नृपाल आणि चित्रलेखा पाटील यांची नावे पेझारी मतदार यादीतून कमी करुन आता अलिबाग शहरात नोंदविण्यात आली आहेत. नृपाल पाटील यांनी या आधी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांचा राष्ट्रवादीच्या महेंद्र दळवी यांनी पराभव केला होता. त्यानंतर नृपाल यांनी राजकारणापासून अलिप्त राहून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांना राजकारणात पुन्हा सक्षमपणे सक्रिय करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी अलिबाग शहराची निवड केली आहे. त्याचप्रमाणे नृपाल यांच्या पत्नी चित्रलेखा या शेकापच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला अलिबागमधूनच चांगला आकार मिळणार होता. कारण अलिबाग शहरातील राजकारणावर प्रशांत नाईक यांची चांगलीच पकड आहे. त्यांनी तेथे चांगले ग्राऊंड तयार केले आहे. त्यामुळे नृपाल आणि चित्रलेखा यांच्यासाठी ते लाभदायक ठरणारे आहे.नाईक हे नृपाल यांचे नात्याने मामा लागतात. मध्यंतरी ज्येष्ठ नागरिक इमारतीच्या उद््घाटन प्रसंगी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नृपाल, चित्रलेखा यांना नाईक यांच्या पॉलिटिकल मायलेजवर स्वार होऊनच राजकीय उंची गाठावी लागणार असल्याचे बोलले जाते.सर्वांचेच लक्ष वेधले निवडणुकीच्या तोंडावर मतदार ग्रामीण भागातून शहरी भागात, तर शहरी भागातून ग्रामीण भागात आपली नावे नोंदविण्याची प्रक्रिया करीत असतात. परंतु एखादा मतदार हा एखाद्या बलाढ्य नेत्याचा नातेवाईक असतो तेव्हा त्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले जाते आणि त्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. तसेच नृपाल आणि चित्रलेखा यांच्या बाबतीत झाले आहे.