शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

पोलिसांची दहा वर्षांतील विक्रमी कामगिरी

By admin | Updated: January 8, 2016 02:15 IST

२०१५ हे वर्ष नवी मुंबई पोलिसांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबई२०१५ हे वर्ष नवी मुंबई पोलिसांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे. संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर मोक्का लावल्यामुळे पोलिसांचा दबदबा निर्माण झाला आहे. दहा वर्षांमध्ये प्रथमच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयामध्ये गुन्हे सिद्ध करण्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे प्रमाण राज्यात सर्वात जास्त आहे. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. परंतु गुन्हे प्रकटीकरणामध्ये अपेक्षित वाढ होत नव्हती. सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांनी शहरात धुमाकूळ घातला होता. रात्री घराबाहेर उभे केलेले वाहन सकाळी तेथे दिसेलच याची खात्री राहिली नव्हती. के. एल. प्रसाद यांनी आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनस्तरावर गुन्ह्यांचे प्रकटीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले. परिमंडळ एक, परिमंडळ दोन व गुन्हे शाखेमध्ये चांगला संवाद सुरू केला. पोलीस व नागरिकांमधील सुसंवाद वाढविण्यावरही प्रभात रंजन यांनी भर दिला आहे. शहरातील पोलीस मित्रांची संख्या वाढविली. परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी शहरातील जुगार अड्डे बंद केले आहेत. परिमंडळ दोनचे विश्वास पांढरे यांनी आदिवासींसाठी तीन ट्रक साहित्य शहरवासीयांकडून संकलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सुरेश मेंगडे गुन्हे शाखेचे उपआयुक्त असताना संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यमान उपआयुक्त दिलीप सावंत यांनीही त्यांच्या कामाचा प्रभाव दाखविण्यास सुरवात केली असून वाहनचोरीची टोळी पकडून त्यांच्याकडून एकाचवेळी २१ रिक्षा हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी २०१५ मधील ६७ टक्के गुन्ह्यांचा तपास लावला आहे. दहा वर्षातील ही विक्रमी कामगिरी आहे. शिवाय २०१४ मधील तब्बल १४२ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे. गतवर्षी ५२८८ गुन्हे घडले होते. यामधील ३६२० गुन्ह्यांचा वर्षभरात उलगडा झाला होता. यावर्षी १४२ गुन्ह्यांचा उलगडा केल्यामुळे ही संख्या ३५६१ झाली आहे. गतवर्षीच्या गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ६५ टक्के होते ते आता ६७ टक्के झाले आहे.