शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची २८ हुक्का पार्लरवर कारवाई

By admin | Updated: June 1, 2017 05:39 IST

महामुंबईची तरुणाई हुक्क्याच्या गर्तेत असल्याचे लोकमतने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी २८ हुक्का पार्लरवर कारवाई केली

सूर्यकांत वाघमारे /लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महामुंबईची तरुणाई हुक्क्याच्या गर्तेत असल्याचे लोकमतने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी २८ हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. मात्र यानंतरही काही हुक्का पार्लर सुरु असून त्यांचे मालक काही शासकीय अधिकाऱ्यांचे नातलग आहेत. यामुळे हुक्का पार्लरसंबंधी ठोस कायदाच नसल्याचा आधार घेत त्यांच्याकडून पोलिसांनाच ज्ञान पाजळवले जात आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात हुक्का संस्कृती फैलावत चालली असून, त्यामुळे तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. विशेष बाब म्हणजे मागील आठ ते दहा महिन्यांत हे हुक्का पार्लरचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. अगदी पहाटेपर्यंत हे हुक्का पार्लर चालत असून त्याठिकाणी तरुण- तरुणी हुक्क्याचा दम मारत बसत आहेत. त्यापैकी बहुतांश हुक्का पार्लर पालिकेच्या गुमास्ता, हॉटेल परवान्याच्या नावाखाली चालत आहेत. मात्र हुक्क्याच्या तलपेने रात्री अपरात्री घराबाहेर फिरणाऱ्या तरुण- तरुणींमुळे शहरात कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. हीच बाब लोकमतने शहरातील हुक्का पार्लरचे स्टिंग आॅपरेशन करुन उघड केली होती. लोकमतच्या या दणक्यानंतर खडबडून झालेल्या पोलीस यंत्रणेने अखेर सर्वच हुक्का पार्लरची झाडाझडती घेवून कारवाईला सुरवात केली आहे. त्यानुसार २८ हुक्का पार्लरवर कारवाई झाली आहे. त्यामध्ये अवघ्या एपीएमसी पोलिसांनी १९ कारवाया झाल्या असून वाशी पोलिसांनी ६, नेरुळ पोलिसांनी दोन तर कोपरखैरणे पोलिसांनी एक कारवाई केली आहे. तर कारवाईच्या निमित्ताने काही हुक्का पार्लरच्या ठिकाणी गेलेल्या पोलिसांना विरोधाला देखील सामोरे जावे लागले.सुरु असलेल्या हुक्का पार्लरपैकी काही शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नातलगांचे आहेत. यामुळे स्थानिक पोलीस त्याठिकाणी कारवाईला जाताच त्यांच्यावर शासकीय सेवेतील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा दबाव येत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हुक्का पार्लरवर नियंत्रणासाठी शासनाने विशेष कायदा करण्याची गरज व्यक्त होत आहे. राज्य शासनाने २०११ मध्ये हुक्का पार्लर बंदीचे सकारात्मक पाऊल उचलले होते. यावेळी शासनाच्या भूमिकेविरोधात झालेल्या याचिकेनंतर न्यायालयाने हुक्का पार्लरसाठी नियमावली आखून दिली आहे. तर सिगारेट आणि इतर पदार्थ कायद्याअंतर्गत (कोप्ता) पोलिसांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. परंतु या नियमावलीत हुक्का पार्लर चालकाने नियमभंग केल्यास साधारण दोनशे रुपये दंडाची तरतूद असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे हुक्का पार्लर चालकांवर कायद्याचा धाक राहत नसून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे.