शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भावावर वार करून गाठले पोलीस ठाणे

By admin | Updated: June 13, 2017 03:33 IST

चुलत भावाच्या डोक्यात वार करून मारेकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. गावावरून आलेल्या चुलत भावाला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चुलत भावाच्या डोक्यात वार करून मारेकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. गावावरून आलेल्या चुलत भावाला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून हत्येच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. परंतु वेळीच दुसऱ्या चुलत भावाने त्याठिकाणी धाव घेतल्याने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.अमित जेधे असे या प्रकारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा पुण्यातील खडकवासला भागातील राहणारा आहे. त्याच्या कुटुंबातील काही जण कोपरखैरणेत राहायला आहेत. यानुसार रविवारी तो मावस बहिणीच्या भेटीसाठी कोपरखैरणेत आला होता. यावेळी सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या सागर जेधे या चुलत भावाने त्याला फोन करून घरी बोलावले. यानुसार अमित त्याठिकाणी गेला असता, दोघांनी एकत्र जेवण करून काही वेळ गप्पा देखील मारल्या. यावेळी गावी असताना तुझ्या वडिलांनी मला का मारले, असा प्रश्न सागर याने अमितला विचारला. परंतु त्याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे अमितने सांगितले. यानंतर काही वेळाने दोघे जण घराबाहेर निघत असताना सागरने पाठीमागून अमितच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमितने आरडाओरडा केला असता, शेजारीच राहणाऱ्या त्याच्या नितीन जेधे या दुसऱ्या चुलत भावाने त्याठिकाणी धाव घेवून अमितची सुटका केली. यानंतर तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या हल्ल्यानंतर सागर हा पळाल्याचा सर्वांनी संशय व्यक्त करत असतानाच त्याने थेट पोलीस ठाणे गाठले होते. मी माझ्या भावालामारले आहे, असे सांगत त्याने स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.- अमितवरील हल्ल्याची माहिती मिळताच, पुणे येथून त्याच्या कुटुंबीयांनी नवी मुंबईकडे धाव घेतली. परंतु सागरने त्याच्यावर का हल्ला केला याचे ठोस कारण कळलेले नाही. हल्ल्यात अमित गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर याने अमितवर हल्ल्याचा कट अगोदरच रचला होता अशी शक्यता वर्तवली जात आहे. याकरिता त्याने कोयत्याप्रमाणे धारदार शस्त्र देखील घरात आणून ठेवले होते.