शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या सुरक्षेला पोलिसांचा ‘प्रतिसाद‘

By admin | Updated: May 29, 2016 03:12 IST

संकटसमयी ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशाने राज्य पोलिसांतर्फे ‘प्रतिसाद‘ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा

नवी मुंबई : संकटसमयी ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशाने राज्य पोलिसांतर्फे ‘प्रतिसाद‘ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा व ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षेची माहिती देण्याकरिता नेरूळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उपस्थित ज्येष्ठांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.बदलत्या कुटुंब व्यवस्थेमुळे काहीसे दुर्लक्षित होत चाललेल्या ज्येष्ठांसाठी महापालिकेसह पोलीस प्रशासन सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. महापालिकेने ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची स्थापना केलेली असून, नवी मुंबई पोलिसांकडून मेळाव्याच्या माध्यमातून ज्येष्ठांचे मनोरंजन केले जाते. परंतु सुरक्षा हा देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे ज्येष्ठांच्या सुरक्षेवर पोलिसांकडून विशेष भर दिला जात आहे. नोकरी- व्यवसायानिमित्ताने मुले व सुना घराबाहेर जात असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटेच असतात. यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांवर हल्ले करून घरफोडीचे गुन्हे घडत आहेत. अशा घटनांमध्ये मुंबई, नवी मुंबईत काही ज्येष्ठांचे प्राण देखील गेलेले आहेत. त्यामुळे राज्य पोलिसांच्या वतीने ‘प्रतिसाद‘ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण करून त्याची माहिती देण्याकरिता नेरूळ पोलिसांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंडर्स पार्कमध्ये झालेल्या या कार्यक्रमास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त प्रशांत खैरे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक महासंघाचे अजीवन सदस्य शंकर किंजवडेकर, वर्षा रोकडे, वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ आदी उपस्थित होते.यावेळी संकटसमयी मोबाइलमधील प्रतिसाद अ‍ॅप्लिकेशन कसे वापरायचे, याची माहिती ज्येष्ठांना देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान आयुक्त नगराळे यांनीच उपस्थितांच्या समक्ष अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून पोलिसांची तत्काळ मदत कशी उपलब्ध होते, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असल्याचे सांगत एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांमधील भीती दूर केली. सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)