शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

एपीएमसीजवळील बारवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:49 IST

पाच जणांना अटक; वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे उघड

नवी मुंबई : एपीएमसीजवळील बारवर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकला. ४० महिला वेटरना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. बारच्या नावाने वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.येथील मॅफ्को मार्केटला लागून ब्ल्यू स्टार बार आहे. लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी मुली उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला होता. ११.३० वाजता एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्याने पसंत केलेल्या मुलीला याच परिसरातील एका लॉजवर घेऊन जाण्याची परवानगी बार व्यवस्थापनाने दिली.मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी बार व लॉज दोन्ही ठिकाणी छापा टाकला. बारमधून जवळपास ४० मुलींना ताब्यात घेतले. व्यवस्थापकासह एकूण पाच जणांना अटक केली आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांनी बारमधून ताब्यात घेतलेल्या सर्व महिला वेटरना वैद्यकीय तपासणीसाठी मनपा रुग्णालयात पाठविले. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी असल्याचेही निदर्शनास आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर महिला वेटरना सोडून देण्यात आले आहे.एपीएमसी परिसरामधील या बारमध्ये अनेक दिवसांपासून अशाप्रकारचा व्यवसाय सुरू होता. बारविषयी स्थानिक नागरिकांनीही या पूर्वी अनेक वेळा तक्रारी दिल्या होत्या. रहिवासी क्षेत्र असल्यामुळे येथे लेडीज सर्व्हिस बारला परवानगी दिली जाऊ नये, यासाठीही पत्रव्यवहार केले होते. या परिसरामधील लॉजमध्येही अनैतिक व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या; परंतु याविषयी ठोस पुरावे नसल्याने कारवाई होत नव्हती. गुन्हे शाखेच्या पथकाकडे केलेल्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे उपआयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याविषयी पिटा कायद्यांतर्गत एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.