शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील बससेवेला पोलीस सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 02:19 IST

पनवेल परिसरातील रिक्षावाले मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे

पनवेल : पनवेल परिसरातील रिक्षावाले मनमानी भाडे आकारतात. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी शहरात बससेवा सुरू करण्यात आली आहे. एनएमएमटीकडून सुरू करण्यात आलेल्या बससेवेला रिक्षावाल्यांकडून सातत्याने विरोध होत आहे. करंजाडे येथून नव्याने सुरू केलेली बस सेवा बंद पाडण्यासाठी रिक्षाचालकांचा प्रयत्न सुरू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे रिक्षाचालकांच्या विरोधाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत प्रवासांच्या बाजूने उभे राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. पनवेल शहराबरोबरच नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर, रोडपाली, उलवे, तळोजा हे नोड सिडकोने विकसीत केले आहेत. या ठिकाणची लोकवस्ती दिवसन्दिवस वाढत आहे. मुंबई आणि उपनगरात नोकरी करणारे चाकरमानी या भागात जास्त राहतात. ते दररोज उपनगरीय रेल्वे गाडयांनी ये जा करता. मात्र रेल्वेस्थानकापर्यंत पोहचण्याकरीता अंतर्गत वाहतुक व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते. याशिवाय अंतर्गत प्रवासाकरीता पूर्वी रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. तीनआसनी रिक्षाचालकांनी मक्तेदारीमुळे आजपर्यंत मीटर डाऊन केलेला नाही. त्याचबरोबर प्रत्येक वसाहतीत स्थानिक रिक्षावाल्यांची मक्तेदारी असल्याचा भार प्रवाशांना सहन करावा लागतो. एनएमएमटीने सुरुवातीला मानसरोवर, खांदेश्वर ही कामोठे वसाहतीत अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर रोडपाली - मानसरोवर ही बस सुरू करण्यात आली. यावेळी स्थानिक रिक्षावाल्यांनी प्रचंड विरोध केला, बस अडवण्याचेही प्रकार झाले. मात्र तरीही बससेवा सुरूच राहिली. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या खांदेश्वर ते विचुंबे बससेवेलाही विरोध झाला. चार दिवसापूर्वी करंजाडे-पनवेल रेल्वेस्थानक या दरम्यान बस सुरू करण्यात आली. या सेवेमुळे स्थानिक रिक्षावाल्यांच्या मक्तेदारीला आळा बसला आहे. रिक्षावाल्यांनी या विरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतली. याप्रकरणी रिक्षाचालकांची समजूत काढण्याऐवजी आमदार प्रशांत ठाकूर यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर ही बससेवा शहरातील ठरावीक मार्गावरून सुरू ठेवावी, अशा सूचनाही केल्या. ठाकूर यांच्या भूमिकेमुळे बस प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी गुरूवारी बैठक बोलावली होती. त्यावेळी साळवे यांनी कोणत्याही परिस्थितीत बससेवा बंद होणार नसल्याची भूमिका घेतली.