शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाळणाघरांसह वृद्धाश्रमांवर पोलिसांची नजर

By admin | Updated: January 9, 2017 06:41 IST

खारघर येथील पाळणाघरातील प्रकारानंतर आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच पाळणाघर, वृद्धाश्रम तसेच हॉस्टेल्स यांना पोलिसांकडे नोंदणी

नवी मुंबई : खारघर येथील पाळणाघरातील प्रकारानंतर आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच पाळणाघर, वृद्धाश्रम तसेच हॉस्टेल्स यांना पोलिसांकडे नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील १८३ केंद्रांची नोंदणी झालेली असून, त्या सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची सक्त ताकीद पोलिसांतर्फे संस्थाचालकांना देण्यात आलेली आहे. यामुळे त्या ठिकाणच्या गैरप्रकारांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.खारघर येथील ‘पूर्वा डे केअर’ या पाळणाघरात चिमुकल्याला अमानुषपणे मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून पालकांनी डे केअर विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती; परंतु पोलिसांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्यानंतर पालकांनी मिळवलेल्या त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या चित्रिकरणातून संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक केलेली आहे. ज्या महिलेने मारहाण केलेली ती मनोरुग्ण असल्याचेही भासवण्याचा प्रयत्न त्या वेळी कारवाई टाळण्याच्या उद्देशाने झाला होता. दरम्यान, पालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचेही निलंबन करण्यात आले आहे. मात्र, भविष्यात असाच प्रकार पुन्हा इतर कोणत्या डे केअरमध्ये घडू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे. त्याकरिता आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सर्व पाळणाघरांना पोलिसांकडे नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे. शिवाय, त्या ठिकाणच्या कामगारांची छायाचित्रासह संपूर्ण माहिती पोलिसांकडे संग्रहित राहणार आहे. अशातच ठाणे येथील वृद्धाश्रमातील प्रकरणानंतर पाळणाघरांसह वृद्धाश्रम, पुरुष व महिला वसतिगृहे, विद्यार्थी वसतिगृहे यांनाही नोंदणी सक्तीची केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. सद्यस्थितीला १८३ केंद्रांची नोंदणी झालेली असून त्यांना सीसीटीव्ही बसवण्याच्याही सूचना केलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी सर्वाधिक संस्था परिमंडळ २ मधील पनवेल व लगतच्या परिसरात चालत आहेत. पोलिसांनी केलेल्या संपूर्ण सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना ९० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. यानंतरही नोंदणी अथवा सीसीटीव्ही बसवण्यास टाळाटाळ करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा आयुक्त नगराळे यांनी दिला आहे. एखाद्या पालकाला संबंधित पाळणाघरातील सीसीटीव्हीचे चित्रिकरण हवे असल्यास, ते उपलब्ध करून देण्याची यंत्रणाही उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पोलिसांतर्फे देण्यात आलेल्या आहेत. यामुळे खारघर येथील डे केअरमधील प्रकाराची पुनरावृत्ती शहरात इतर कोणत्या ठिकाणी होणार नाही, असा विश्वास नवी मुंबई पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)