शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांची नजर

By admin | Updated: July 12, 2016 02:49 IST

मुंबईला जोडल्या जाणाऱ्या मार्गांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या वाशी खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांनी विशेष भर दिला आहे.

नवी मुंबई : मुंबईला जोडल्या जाणाऱ्या मार्गांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या वाशी खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांनी विशेष भर दिला आहे. इतर काही पुलांसह या पुलाला दहशतवाद्यांच्या कारवाईचा धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंबंधीची माहिती राज्य गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागल्याची शक्यता वर्तविली जात असली तरी पोलिसांनी मात्र त्यास दुजोरा दिला नाही.देशात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांकडून यापुढे मुंबईला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशा स्वरूपाचे गोपनीय संभाषण गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानुसार मुंबईत संभाव्य धोका असलेल्या ठिकाणांसह वाशी खाडीपुलाच्या सुरक्षेवर पोलिसांनी विशेष भर दिला आहे. याकरिता मागील पाच दिवसांपासून वाशी खाडीपुलाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून पुलालगत घडणाऱ्या प्रत्येक गैर हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी हा पूल त्या ठिकाणी होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेचा विषय ठरलेला आहे. अशातच त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा संभाव्य धोका असल्याच्या शक्यतेवरून पुन्हा वाशी खाडीपूल चर्चेचा भाग बनला आहे.सायन-पनवेल मार्गावर असलेल्या या पूलावरून प्रतिदिन शेकडो वाहने त्यावरून मुंबईत ये-जा करतात. शिवाय लगतच रेल्वे पूल देखील आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या रडारवर हा पूल येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु नवी मुंबई पोलिसांनी मात्र पुलाला धोका असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पुलाच्या सुरक्षेला धोका असल्याची कसलीही सूचना गुप्तचर यंत्रणेकडून आलेली नाही. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चा अफवा आहेत. तसेच पुलालगतचा बंदोबस्त हा नियमित असल्याचे विशेष शाखा उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)