शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियनवर कारवाईचा पोलिसांना ताप

By admin | Updated: March 28, 2016 02:34 IST

परदेशी पाहुणे म्हणून देशात येणाऱ्या नागरिकांपैकी नायजेरियन हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. लॉटरी स्कॅम, फिशिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईपरदेशी पाहुणे म्हणून देशात येणाऱ्या नागरिकांपैकी नायजेरियन हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. लॉटरी स्कॅम, फिशिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत सहभाग असलेल्या नायजेरियन नागरिकांवर विचारपूर्वक कारवाई करावी लागत आहे. अशा गुन्ह्यांचा खटला न्यायालयात उभा राहिल्यानंतर तो निकाली लागेपर्यंत या परदेशी गुन्हेगारांचा संपूर्ण भार पोलिसांवर पडत आहे. आॅनलाइन पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची ओळख नायजेरियन स्कॅम म्हणून देशभर झालेली आहे. नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने भारतात आलेले हे परदेशी पाहुणे देशभर गुन्हेगारीचे जाळे पसरवत असून, त्यापैकी अनेक जण व्हिसा संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करत आहेत. परंतु अशा नायजेरियन नागरिकांना शोधून त्यांची मायदेशी रवानगी करणे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे पोलिसांना तापदायक ठरत आहे. यामुळे अनेक प्रकारांमध्ये पोलिसांकडूनही त्यांच्यावर कारवाईला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या परदेशी पाहुण्यांना वेळीच आवर घालण्यासाठी शासन स्तरावरच निर्णय घेण्याची गरज भासू लागली आहे.मुंबईनंतर नवी मुंबईत नायजेरियन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यापैकी बहुतेक जण व्हिसा संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करत असल्याचे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या अनेक कारवायांमधून सिध्द झाले आहे. पर्यटनाच्या बहाण्याने ठिकठिकाणी फिरत असतानाच त्यांच्याकडून अमली पदार्थांची तस्करी देखील केली जाते. अशा काही नायजेरियनवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाया देखील केलेल्या आहेत. परंतु एका नायजेरियनवर कारवाई केल्यानंतर दुसऱ्यावर कारवाईपूर्वी त्यांना विचार करणे भाग पडत आहे.गुन्हेगारी मानसिकतेच्या या परदेशी पाहुण्यांना आवरण्यासाठीच पोलिसांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावावे लागते. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून होणाऱ्या शक्तिशाली प्रतिकारात वाशी पोलिसांच्या एका चौकीची तोडफोड झाली होती, तर कोपरखैरणेत कारवाईदरम्यान काहींनी दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारात एखादा दगावल्यास आपलाच बळी जायचा अशीही भीती पोलिसांना सतावू लागली आहे. नवी मुंबईत कोपरखैरणे व जुहूगाव येथे मोठ्या संख्येने नायजेरियन्सचे वास्तव्य आहे. मागील काही महिन्यात त्यांच्या सातत्याने झालेल्या झडतीमुळे काहींनी मुक्कामाचे ठिकाण बदलले आहे.परंतु काही प्रकरणांमध्ये नायजेरियन आपसातील किरकोळ गुन्ह्यात स्वत:ला गुंतवून घेत असल्याचेही दिसून येते. अशा गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना अपेक्षित असलेले भारतातले वास्तव्य वाढते. सद्य:स्थितीला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ३१ गुन्ह्यांमध्ये ५४ नायजेरियन्सवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी कोपरखैरणे व वाशी पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पारपत्र कायदा, आॅनलाइन फसवणूक, अमली पदार्थ तस्करी, मारहाण अशा अनेक गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. परंतु कारवाई केल्यानंतर गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत या नायजेरियन्सची करावी लागणारी उठाठेव पोलिसांना त्रासदायक ठरत आहे.पोलीस ठाण्यातही गोंधळ - नायजेरियन नागरिक पासपोर्टची मुदत संपली तरी देशातच राहण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी एखादा गुन्हा करून स्वत:हून अटकही करून घेतली जाते. फसवणूक व इतर गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या अनेकांना अमली पदार्थांचे व्यसन असते. - कोठडीतही ते हंगामा करून पोलीस स्टेशन डोक्यावर घेतात. अनेक जण स्वत:ला जखमा करून घेत आहेत. - हे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असले तरी त्यांच्यावर संबंधित पोलीस स्टेशनला लक्ष द्यावे लागते. जामिनावर सुटलेले देशाबाहेर पळून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. शासनाकडून पैसे मिळण्यास विलंब- संशयित म्हणून अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांचा आर्थिक भुर्दंडही पोलिसांना सहन करावा लागत आहे. - अटक गुन्ह्यामधील आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ देशी पाठविण्याची जबाबदारीही पोलिसांचीच असते. यासाठीचा खर्च शासन देते. परंतु तो वेळेत मिळत नसल्याने त्याचा भुर्दंड पोलिसांना बसू लागला आहे.