ठाणो : रेल्वेमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असताना तीन ते चार किलोचे सोने व रोकड असा 38 लाखांचा ऐवज तसेच सात हि:यांचे पाकीट (4क् लाख अमेरिकन डॉलर किमतीचे) असा हवालातील घोटाळा उघड करणा:या पोलीस शिपाई एकनाथ माने यांच्यावरच खोटे गुन्हे नोंदवून निलंबित करून त्यांना बडतर्फ करण्यात आले. यामुळे आपल्यावरील या अन्यायाविरुद्ध त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले असून, पोलीस दलात पुन्हा रुजू न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे.
माने हे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल पोलीस ठाण्यात 27 मे 2क्11 मध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असताना काही संशयितांची त्यांनी चौकशी करून त्यांच्याकडून सुमारे तीन ते चार किलो सोने व रोकड असा 38 लाख 2क् हजार 7क् रुपयांचा ऐवज त्यांच्याकडे मिळाला होता़ ही रोकड व सोन्याच्या पावत्या तसेच पुरावे देण्यास संशयितांनी असमर्थता दर्शविली होती. त्या वेळी दिवसपाळीचे ठाणो अंमलदार आणि प्रभारी अधिकारी यांना सर्व माहिती देऊन शासनाच्या वतीने स्वत: फिर्यादी म्हणून हवाला रॅकेटची केस दाखल करण्याची त्यांनी विनंती केली. मात्र तत्कालीन अधिका:यांनी ‘त्या’ संशयितांवर एफआयआर न दाखल करता आपल्यालाच दमबाजी केल्याचे मानेंनी या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर 2 ऑगस्ट 2क्11 रोजी बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तिथेही 4क् लाख अमेरिकन डॉलर किमतीचे सात हि:यांचे पाकीट, जिवंत काडतूस, एक रिव्हॉल्व्हर पकडले होते. त्यानंतर हवाला रॅकेटचा अर्ज केला म्हणून 15 नोव्हेंबर 2क्13 रोजी मुंबई सेन्ट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करून दोन दिवस कोठडीत मारहाणही केली. एकीकडे जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा मलिन होत असताना 26 नोव्हेंबर 2क्क्8 रोजी चांगली कामगिरी बजावूनही कर्तव्यदक्ष म्हणून नावलौकिक कामगिरी केली म्हणून प्रोत्साहन मिळणो अपेक्षित होते. बदनामी झाल्यामुळे प}ी मुलेही सोडून गेली. (प्रतिनिधी)
आपल्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करावी, ती झाली नाही तर
जगणो मुश्कील होईल. तरी येत्या 15 दिवसांमध्ये चौकशी करून फेरनियुक्तीचे आदेश शासनाने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी न झाल्यास आपण आमरण उपोषण करणार असल्याचाही इशारा एकनाथ माने यांनी दिला आहे.