शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डीजे, ढोल पथकांना पोलिसांची तंबी

By admin | Updated: April 22, 2017 02:56 IST

समारंभात रात्री उशिरापर्यंत वाजवल्या जाणाऱ्या डीजेला यापुढे लगाम घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. कोपरखैरणे व करावे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर

नवी मुंबई : समारंभात रात्री उशिरापर्यंत वाजवल्या जाणाऱ्या डीजेला यापुढे लगाम घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. कोपरखैरणे व करावे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या हालचाली सुरू आहेत. त्याकरिता काही दिवसातच प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय डीजे व ढोल पथकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.बुधवारी मध्यरात्री नवी मुंबई पोलिसांनी उशिरापर्यंत चाललेल्या हळदीच्या डीजेवर तीन ठिकाणी कारवाई केली. कोपरखैरणे, करावे व बेलापूर याठिकाणी झालेल्या या कारवाईदरम्यान स्थानिकांसोबत झालेल्या वादातून पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. या प्रकारात सहा जणांसह दोन पोलीसही जखमी झाले आहेत. तर तिघांना पोलिसांनी अटक केली असून डीजेचे साहित्यही जप्त केले आहे. मात्र पोलिसांकडून महिलांनाही मारहाण झाल्यामुळे या कारवाईचा निषेध व्यक्त होत आहे. तर दोषी पोलिसांवर देखील कारवाई व्हावी, अशी मागणी देखील लोकप्रतिनिधींकडून पोलीस उपआयुक्तांकडे करण्यात आली आहे. यापूर्वी सानपाडा येथे देखील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कौटुंबिक समारंभाचा डीजे थांबवल्यामुळे वाद उद्भवून तरुणांनी पोलिसांच्या पथकावर सोडा व बीअरच्या बाटल्या फेकल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे सध्याचे प्रकरण तूर्तास निवळले असले तरी देखील भविष्यात पुन्हा हळदी समारंभात वाजवल्या जाणाऱ्या डीजेवरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे. याची खबरदारी म्हणून रात्री उशिरापर्यंत चालणारे डीजे यापुढे पूर्णपणे बंद करण्याच्या प्रयत्नात नवी मुंबई पोलीस आहेत. त्याकरिता शहरातील सर्व डीजे व ढोल पथक यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे सह आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत त्याची पूर्तता केली जाणार आहे. त्याकरिता सर्व डीजे व ढोल पथकांची बैठक देखील घेतली जाणार आहे. या बैठकीत त्यांना रात्री १० वाजल्यानंतर वाद्य बंद करण्याची सक्त ताकीद दिली जाणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. त्यामुळे समारंभ आयोजकाचा आग्रह असला तरीही डीजे चालकाला वेळेतच वाद्य बंद करणे भाग पडणार आहे. अन्यथा त्यांच्यावर ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच समारंभ सुरू असतानाच आयोजकांनाही लेखी नोटीस बजावून त्याठिकाणचे वाद्य १० वाजताच बंद करण्याचे सूचित केले जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रीपाठोपाठ कौटुंबिक समारंभाला देखील रात्री वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे. (प्रतिनिधी)- शहरातील सर्व डीजे व ढोल पथक यांना नोटीस बजावली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत त्याची पूर्तता करून डीजे व ढोल पथकांची बैठक देखील घेतली जाणार आहे. या बैठकीत त्यांना रात्री १० वाजल्यानंतर वाद्य बंद करण्याची सक्त ताकीद दिली जाणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.