शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीची होणार पुनर्बांधणी

By admin | Updated: April 19, 2017 00:53 IST

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीबीडी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीबीडी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला. या निर्णयामुळे वसाहतीतील ३२४ कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने १९७९ मध्ये पोलिसांच्या निवासासाठी सीबीडी सेक्टर १ येथे वसाहत बांधली. त्यानंतर ही वसाहत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. या वसाहतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण ३२४ कुटुंबे वास्तव्याला आहेत. सुरुवातीच्या काळात बांधकाम विभागाकडून या वसाहतीची देखभाल करण्यात येत होती. परंतु मागील दहा वर्षांपासून या विभागाने देखभाल व दुरुस्तीकडे पाठ फिरविल्याने सध्या या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. इमारती जीर्ण झाल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. छताचे प्लास्टर निखळण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. मलनि:सारण वाहिन्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. एकूणच येथील रहिवाशांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सदर वसाहतीची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी २00४ पासून हा प्रश्न लावून धरला आहे. विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडून या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. तसेच विविध स्तरावर बैठका घेवून पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडे आग्रही भूमिका घेतली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सीबीडीतील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सिडकोला देय असलेल्या ३ कोटी १५ लाख रुपयांपैकी २ कोटी ८0 लाख रुपयांचे व्याज व दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. उर्वरित ३५ लाख रुपयांची रक्कम सिडकोला अदा करण्याचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी मान्य केल्याने दीर्घकाळ रखडलेल्या या वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मुद्दा निकाली निघाला आहे.या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सिडकोच्या मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक फैयाज खान, गृहविभागाचे सचिव, मुख्य अभियंता एम.एन. डेकाटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)