शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेसाठी पोलीस बनले वेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 02:55 IST

बंगळुरूच्या हॉटेलमध्ये थरारनाट्य

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : भाड्याने घेतलेल्या गाड्या परराज्यात विकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला अटक करण्यासाठी पोलिसांना वेटरची भूमिका करावी लागली. तीन दिवस वेटर बनून पाळत ठेवल्यानंतर तो नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. 

अँथोनी पॉलच्या टोळीने अंधेरी येथे नवे कार्यालय सुरू करून भाड्याने देण्यासाठी गाड्या घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण कोपरकर यांनी तिथे पाळत ठेवली. या वेळी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर येथे राहत असल्याची माहिती समोर आली. परंतु तो कधीतरीच त्या ठिकाणी येत असल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्याच्याच शेजारची खोली पोलिसांनी भाड्याने घेतली. या वेळी सहायक निरीक्षक राजेश गज्जल, लक्ष्मण कोपरकर, ऊर्मिला बोराडे व राहुल वाघ हे त्या ठिकाणी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान त्या ठिकाणी तळ ठोकून होते. अखेर ५ तारखेला तो पत्नीला भेटायला आला असता पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत मुख्य सूत्रधार अँथोनी पॉल याच्याविषयी माहिती मिळाली. परंतु पॉल हा दुबईचे मोबाइल सिम वापरून सर्वांना चकमा देत होता. अखेर तो बंगळुरू येथे एका हॉटेलमध्ये राहत असल्याचे समजले. यानुसार गज्जल हे संजय पवार व राहुल वाघ यांच्यासह त्याच दिवशी बंगळुरूला गेले. गज्जल व वाघ हे त्या ठिकाणी तीन दिवस वेटर म्हणून वावरू लागले. अखेर तीन दिवसांनी पॉल हा खोलीत आला असता गज्जल यांनी वेटर बनून खोलीत जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

३०० हून अधिक गाड्या विकल्याची शक्यतापोलिसांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे गुन्हे शाखा पोलिसांनी तत्काळ गुजरात येथे ठिकठिकाणी छापे मारून विकलेल्या चोरीच्या २० गाड्या जप्त केल्या. या टोळीने राज्यभरातून ३०० हून अधिक गाड्या चोरून गुजरात व इतर राज्यांत विकल्याची शक्यता आहे. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेचे पथक सलग २५ दिवस कार्यरत होते.

सूत्रधाराला पहिल्यांदाच अटकगाड्या घेऊन त्यांची चोरी करणाऱ्या टोळीला सूत्रधारासह पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचा सूत्रधार अँथोनी पॉल हा पहिल्यांदाच अटक झाला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांना वेटर बनून हॉटेलमध्ये राहावे लागले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbangalore-central-pcबंगलोर सेंट्रल