शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची जागृती

By admin | Updated: April 21, 2016 02:14 IST

सुटीच्या दिवसांत वाढणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विष्णूनगर पोलिसांनी जागृतीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सदस्यांच्या बैठका घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

आकाश गायकवाड,  डोंबिवलीसुटीच्या दिवसांत वाढणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विष्णूनगर पोलिसांनी जागृतीसाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सदस्यांच्या बैठका घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, पोलीस अधिकारी आणि तीन बीटमार्शलचे सहा जण दररोज १५ सोसायट्यांना भेट देत आहेत. चोरांपासून सावध राहण्यासाठी कोणती दक्षता घ्यायची, याबाबत ते रहिवाशांना माहिती देत असल्याचे विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रजित कार्ले यांनी सांगितले.घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्या, रस्त्यांत होणारी फसवणूक व लूटमार, बाजारात खरेदीसाठी गेलेल्यांचे पैसे-दागिने चोरणे, प्रवासात बॅगा चोरणे, वाहनचालकांचे लक्ष चुकवून वाहनांतील सामान, पैसे, मौल्यवान वस्तू, लॅपटॉप लांबवण्याच्या घटना घडल्या आहेत. पाळत ठेवून चोरांच्या टोळ्या दिवसा, दुपारी घरफोड्याही करत आहेत. घरातील मंडळी बाहेर गेली की अर्ध्या तासात, तासाभरात चोर घरे साफ करून नेत आहेत. हे गुन्हे एवढ्या सफाईदारपणे केले जातात की, शेजाऱ्यांनाही त्याची कल्पना येत नाही. नागरिकांचा निष्काळजीपणा आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती त्याला कारणीभूत ठरते. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अगर विक्रेता म्हणून इमारतीत शिरलेल्या व्यक्तींनीही चोऱ्या केल्याच्या घटना आहेत.सध्या सुटीच्या दिवसांमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुटीत अनेकजण गावी, पर्यटनाला जातात. त्यामुळे अशा बंद घरांवर चोरटे पाळत ठेवून तेथे घरफोडी करतात. घरमालक परतल्यानंतरच अशा घटना उघडकीस येतात. त्यामुळे त्यांचा तपास लागणेही कठीण होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. बाजारात तसेच इमारतीत आजूबाजूला घडणाऱ्या हालचालींवर, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे, विनाकारण ओळख वाढवून बोलू पाहणाऱ्या आणि लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहावे. बाहेरगावी जाताना घरे व्यवस्थित बंद करावीत. चांगल्या दर्जाची मजबूत कुलुपे वापरावीत. दाराचे कडीकोयंडे बनवताना शोभेपेक्षा मजबुतीवर भर द्यावा. खिडक्या व झरोके, मागील दरवाजे यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात, असे विविध सल्ले पोलीस देत आहेत.