शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात पोलिसांची सोनसाखळी चोरांसोबत झटापट, ऐरोलीतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 17, 2023 19:38 IST

एकाला अटक, दुसरा पळाला

नवी मुंबई :सोनसाखळी चोरी करून पळणाऱ्या एकाला रबाळे पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार पळून गेला असून दोघेही आंबिवलीचे आहेत. पोलिस पाठलाग करून असताना त्यांनी पोलिसांवर हल्ल्याचा देखील प्रयत्न केला. 

सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. याच उद्देशाने रबाळे पोलिसांकडून रविवारी रात्री ऐरोली सेक्टर ८ परिसरात साध्या गणवेशात गस्त घातली जात होती. यादरम्यान राज तवटे (२१) याची चैन चोरून दोघेजण पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यामुळे उपनिरीक्षक दयानंद वणवे, उपनिरीक्षक चंद्रकांत लांडगे, पोलीस नाईक विजय कारंकाळ व राजेंद्र जाधव यांनी दोन मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग सुरु केला. दिवा येथे सिग्नल लागल्याने वाहतूक कोंडी होऊन चोरट्यांनी मोटरसायकल त्यात अडकली होती. यामुळे पोलिसांनी धावत जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना पकडले जात असताना पाठीमागे बसलेल्या गुन्हेगाराकडून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होत होता.

त्यामध्ये त्याने चाकू देखील पोलिसांच्या दिशेने भिरकावला. अखेर काही वेळ चाललेल्या झटापटीमद्ये मुसा सय्यद (२९) हा पोलिसांच्या हाती लागला. तर त्याचा साथीदार हसन अयुब सय्यद इराणी (२२) हा चोरलेली चैन घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली असून ती उल्हासनगर येथून चोरलेली आहे. त्यामुळे हाती लागलेल्या मुसा याच्याकडून सोनसाखळी चोरीसह वाहनचोरीचे देखील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीNavi Mumbaiनवी मुंबई