शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये विषबाधा

By admin | Updated: February 26, 2017 03:03 IST

खारघरमधील पदपथावर असलेल्या डेली बेली नावाच्या दुकानातील बिर्याणी व शोरमा खाल्याने १५ ते २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पनवेल : खारघरमधील पदपथावर असलेल्या डेली बेली नावाच्या दुकानातील बिर्याणी व शोरमा खाल्याने १५ ते २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी घडली असून शनिवारी सायंकाळी एका महिलेने या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. खारघरमधील हिरानंदानी परिसरात डेली बेली हे शोरमा व बिर्याणीचे प्रसिद्ध दुकान असून खारघरबरोबरच पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरांतील अनेक खवय्ये या ठिकाणी येतात. गुरुवारी येथील खाद्यपदार्थ खाल्ल्याने अनेकांना उलटी, जुलाब, तसेच अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे अनेकांनी आपापल्या परिसरातील दवाखान्यात तात्पुरते उपचार घेतले. मात्र, काहींना जास्त त्रास होऊ लागल्याने खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले. या प्रकारानंतर संबंधित दुकानाचा मालक फरार आहे. खारघर मित्र, संजीवनी, श्री रुग्णालय आदी दवाखान्यांत विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काहींना औषधोपचारानंतर सोडण्यात आले आहे. संजीवनी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या हृतिक ठाकूर या विषबाधा झालेल्या तरुणाने सांगितले की, रविवारी रात्री डेली बेली या ठिकाणी खाद्यपदार्थ खाल्ले, त्यानंतर उलटी, जुलाब, थंडी, ताप तसेच अंगदुखीचा त्रास सुरू झाला. दवाखान्यात दाखल केल्यानंतर खाद्यपदार्थातून विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जवळपास पंधरा ते वीस जणांना विषबाधा झाल्याची शक्यता विविध दवाखान्यांत आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून वर्तवण्यात येत आहे. ही घटना उलटून तीन ते चार दिवसांच्या कालावधीनंतर शनिवारी सायंकाळी एका महिलेने या प्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. (प्रतिनिधी)आयुक्तांनी घेतली दखलपनवेलच्या आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अनेक दिवसांपासून अनधिकृत पदपथावर सुरु असलेल्या कारवाईची मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. शनिवारी आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली. - खारघर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. स्वप्निल पवार यांनी संजीवनी दवाखान्यात जाऊन विषबाधा झालेल्या रु ग्णाची भेट घेतली. तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयानेही उघड्यावर खाद्यपदार्थ विकण्यास मनाई केली आहे. मात्र, तरीही शहरात अनेक ठिकाणी हातगाड्या, रस्त्यालगत स्टॉल लावून त्यांची विक्री होत आहे. या खाद्यपदार्थांचा दर्जाही चांगला नसल्याने नागरिकांनी हे पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. खारघरमधील विषबाधेसंदर्भात तपास करीत आहोत. विषबाधा झालेल्यांपैकी एकही व्यक्ती अद्याप तक्रारीसाठी पुढे आलेली नाही. तक्रार केल्यास आम्हाला तपासात मदत होईल. - दिलीप काळे, पोलीस निरीक्षक, खारघर