शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

साडेबारा टक्के लॉटरी लांबणीवर?

By admin | Updated: January 15, 2017 05:45 IST

नवीन वर्षात सिडकोने साडेबारा टक्के भूखंडाची मेगा लॉटरी काढण्याचे जाहीर केले होते; परंतु विविध कारणांमुळे ही लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नोटाबंदीचा रियल इस्टेट

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबईनवीन वर्षात सिडकोने साडेबारा टक्के भूखंडाची मेगा लॉटरी काढण्याचे जाहीर केले होते; परंतु विविध कारणांमुळे ही लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नोटाबंदीचा रियल इस्टेट क्षेत्राला बसलेला फटका हे यापैकी प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी साडेबारा टक्के योजनेची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या योजनेला गती दिली आहे. साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण, पनवेलसह नवी मुंबई क्षेत्रांतील तब्बल ३६0 संचिका भूखंडवाटपासाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. यात रायगड जिल्ह्यातील जवळपास ३00 संचिकांचा समावेश आहे, तर उर्वरित संचिका ठाणे जिल्ह्यातील आहेत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या भूखंडांची मेगा सोडत काढण्याची योजना सिडकोच्या संबंधित विभागाने आखली होती; परंतु ही सोडत आता लांबणीवर पडल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा सर्वाधिक फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे हजारो कोटींचे भूखंड व्यवहार ठप्प पडले आहेत. स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्रीला खीळ बसली आहे. अशा परिस्थितीत साडेबारा टक्के योजनेचे भूखंड घेऊन करायचे काय? असा प्रश्न गुंतवणूकदार व विकासकांना पडला आहे. त्यामुळे तूर्तास ही सोडत घेऊ नये, असा दबाव विकासक व गुंतवणूकदारांकडून टाकला जात असल्याचे समजते. याचाच परिणाम म्हणून ही सोडत काही महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सिडकोच्या योजना विभागाची ढिलाईसाडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडवाटप करण्यासाठी सध्या सिडकोकडे भूखंड शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीतही उपलब्ध भूखंडांच्या बळावर सिडकोने ही मेगा लॉटरी काढण्याची तयारी चालविली आहे. या सोडतीसाठी प्लॅनिंग अर्थात योजना विभागाकडून भूखंड निश्चित करणे गरजेचे असते. नियामानुसार जर २00 मीटर पात्रतेच्या दोन संचिका असतील, तर याच आकाराचे दोनपेक्षा अधिक भूखंड निश्चित करणे गरजेचे असते; परंतु सिडकोच्या योजना विभागाकडून या मेगा लॉटरीसाठी अशाप्रकारे एकही भूखंड निश्चित केला गेला नसल्याचे समजते. लॉटरी प्रक्रिया लांबणीवर पडण्यास योजना विभागाचा हा सुस्त कारभारही तितकाच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.