शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

प्लॅस्टिकमुक्तीला व्यापा-यांचा हरताळ, पनवेलमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:56 AM

प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे.

वैभव गायकर पनवेल : प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. हागणदारीमुक्तीप्रमाणे प्लॅस्टिकमुक्त पनवेल ही संकल्पनाही फक्त कागदावरच राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी १० नोव्हेंबर रोजी महापालिका क्षेत्रामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचे जाहीर केले. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कायद्याने बंदी आहे. परंतु सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी पनवेल ही एकमेव महापालिका असल्याचा दावा केला होता. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांकडून ३० लाख रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली होती. महापालिका प्रशासनाच्या प्लॅस्टिकमुक्तीचे वास्तव तपासण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील सर्व विभागामध्ये जावून पाहणी केली असता प्लॅस्टिकचा पूर्वीप्रमाणेच वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. पालिका मुख्यालयातील कर्मचारीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या पटेल मोहल्ल्यातील मटण व इतर विक्रेते बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. उरण नाक्यावरील हॉटेल, मच्छी मार्केटमध्येही विक्रेते प्लॅस्टिकमध्येच साहित्य ग्राहकांना देत होते. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल परिसरातील भाजी विक्रेते व इतर फेरीवाल्यांनीही महापालिकेचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. विक्रेत्यांना प्रशासनाची भीतीच राहिलेली नाही. प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. दिखावेगिरी करण्यासाठी काही ठिकाणी कारवाई केली जात असल्याची टीकाही होवू लागली आहे.महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात पूर्ण मनपा क्षेत्रामध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. नागरिकांना प्लॅस्टिकला पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. व्यावसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. जनजागृती न करताच आयुक्तांनी सरसकट प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची आयुक्तांनी घाई केली. राज्यातील पहिली महापालिका ठरविण्याच्या अट्टाहासामुळे हाही प्रयोग फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.फक्त कारवाई करून प्लॅस्टिक पिशव्या बंद होणार नाहीत. त्यासाठी महानगरपालिकेला व्यापक जनजागृती करावी लागणार आहे.भिवंडीसह उल्हासनगरमधून येतात प्लॅस्टिक पिशव्यापनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. भिवंडी, उल्हासनगरमधून पिशव्या विक्रीसाठी येत आहेत. महापालिका क्षेत्रातही बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे विक्रेते आहेत. या सर्वांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.प्लॅस्टिकमुक्तीसाठी लोकसहभाग नाहीमहापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. विक्री करणाºयांवर कारवाईही सुरू केली आहे. पण प्लॅस्टिकमुक्त पनवेल ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही. या अभियानामध्ये नागरिकांनीही सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांनी स्वत: या अभियानामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई