शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

भूखंडांअभावी साडेबारा टक्के योजना धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:31 IST

शेवटच्या भूधारकाला भूखंडाचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत सिडकोची साडेबारा टक्के योजना सुरूच राहिली, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : शेवटच्या भूधारकाला भूखंडाचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत सिडकोची साडेबारा टक्के योजना सुरूच राहिली, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. प्रत्यक्ष मात्र सिडकोच्या उदासीन व व्यावसायिक वृत्तीमुळे या योजनेला हरताळ फासला गेला आहे. पात्रताधारकांना देण्यासाठी सिडकोकडे भूखंडच शिल्लक नसल्याने योजनेला धोका निर्माण झाला आहे.साडेबारा टक्के योजना अंतिम टप्प्यात आली आहे. शिल्लक राहिलेल्या पात्र प्रस्तावांचा निपटारा करून ही योजना बंद करण्याचा सिडकोचा विचार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा ठराव संमत करून अंतिम मान्यतेसाठी तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे; परंतु सिडकोच्या या निर्णयाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध आहे. अद्यापि अनेक प्रकरणांत भूखंडवाटप झालेले नाही. पात्रता मंजूर होऊनही भूखंड दिले जात नाही. कारण, सिडकोकडे या योजनेसाठी भूखंड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या उपलब्ध असलेले बहुतांशी भूखंड नोडल क्षेत्रातील आहेत. नोडलचे भूखंड साडेबारा टक्के योजनेअंतर्गत देता येत नसल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. त्यामुळे शेकडो पात्रताधारक साडेबारा टक्के योजनेच्या भूखंडापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही वस्तुस्थिती शेवटच्या भूधारकाला भूखंड मिळेपर्यंत योजना बंद केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सिडकोने साडेबारा टक्के भूखंडांचे नियोजन करावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे. यासंदर्भात आगरी-कोळी युथ फाउंडेशनने अलीकडेच सिडकोला निवेदन दिले आहे.