शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकविरोधात महापालिकेची मोहीम सुरूच; वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूरमध्ये व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:59 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

नवी मुंबई : प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.नेरु ळ विभाग कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर-६ येथील दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये मॉलमधील सर्व व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाºया प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून ११ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. कोपरखैरणे विभागात सहा. आयुक्त अशोक मढवी व बेलापूर कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक प्रतिबंध व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाºया दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई केली. कोपरखैरणेत १३ हजार, तर बेलापुरात १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी वाशी विभाग कार्यक्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्त कारवाई केली होती.११ व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे इनॉर्बिट मॉलमध्ये १२ व्यावसायिकांकडून ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आणि २.५ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी इंद्रजित देशमुख व राजेंद्र पाटील, तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुधीर पोटफोडे व कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक सुषमा देवधर सहभागी होते.महाराष्ट्र राज्यात असलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करणे, तसेच बंदी घातलेले प्लॅस्टिक घटक यांची विक्र ी, साठा अथवा वापर कोणीही करू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही अशा प्रकारचा प्लॅस्टिक वापर करणाºयांवर दंड व जप्तीची कारवाईदेखील करण्यात येत आहे. तथापि, प्लॅस्टिक हे आपल्याच जीवनासाठी हानिकारक आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी बंदी घातलेल्या प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी