शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाने अभ्यासाचा ताण आला नाही; जेईई मुख्य परीक्षेतील टॉपर अथर्व तांबट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:33 IST

अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात अकरावीपासून झाली. क्लासेसमधून मिळणाऱ्या नोट्सचा अभ्यास केला तसेच परीक्षेच्या अगोदर एनसीआरटीमधून अभ्यास केला.

नवी मुंबई : अभ्यास करताना त्याचे व्यवस्थित नियोजन केले होते. त्यामुळे अभ्यासाचा मनावर कधीच तणाव आला नाही, असे अथर्व तांबट याने सांगितले. जेईई मुख्य परीक्षेत अथर्वने १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केले असून, तोे वाशी येथील रहिवासी आहे.

जेईई मुख्य परीक्षेचा मार्चचा अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नुकताच जाहीर करण्यात आला आहे.  या परीक्षेत देशातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थी असून, अथर्व हा नवी मुंबईतील विद्यार्थी आहे. अथर्वचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट मेरी आयसीएसई स्कूल, कोपरखैरणे येथे झाले आहे, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल येथे झाले आहे. अथर्वची आई गृहिणी असून, अथर्वचे वडील खासगी नोकरी करतात. परीक्षेचा अभ्यास अथर्वने दहावीपासूनच मोकळ्या वेळेत सुरू केला होता. 

अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात अकरावीपासून झाली. क्लासेसमधून मिळणाऱ्या नोट्सचा अभ्यास केला तसेच परीक्षेच्या अगोदर एनसीआरटीमधून अभ्यास केला. येतोय असं वाटल्यावर घरी टेबल टेनिस खेळून किंवा गाणी ऐकणे अशा माध्यमातून काही वेळ विरंगुळा करून तणाव घालविल्याचे अथर्वने सांगितले. यापुढे जेईई ॲडव्हान्ससाठी तयारी करत असून, आयआयटी मुंबईमध्ये कॉम्पुटर विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे ध्येय अथर्वने निश्चित केले असल्याचे सांगितले. मुलाच्या यशामुळे अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया आईवडिलांनी दिली असून, नवी मुंबईतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अनेक विद्यार्थी दहावीला चांगले मार्क मिळवतात. परंतु अकरावीला अभ्यास वाढतो त्यामुळे तणावात येतात. अभ्यासाचे योग्य नियोजन करून आपल्या ध्येयाच्या दृष्टीने सातत्य ठेवण्याचा सल्ला अथर्वने जेईई मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

टॅग्स :examपरीक्षा