शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी थंडीतही उबदार फॅशन !

By admin | Updated: December 28, 2015 03:00 IST

बदलत्या ऋतूबरोबर फॅशनमध्येही बदल होतो. हिवाळ््याला सुरुवात होताच बाजारात उबदार कपड्यांच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळत आहेत.

प्राची सोनवणे,  नवी मुंबईबदलत्या ऋतूबरोबर फॅशनमध्येही बदल होतो. हिवाळ््याला सुरुवात होताच बाजारात उबदार कपड्यांच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळत आहेत. विंटर फॅशनचा नवा ट्रेण्ड यंदा पाहायला मिळतोय. स्वेटर्सकडेही एक फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जात असल्याने लाइट वेट स्वेटर्स या पर्यायाला नागरिकांनी चांगलीच पसंती दाखविली आहे. नेहमीच्या लाल, काळ््या चॉकलेटी रंगांची जागा आता रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, फ्लोरोसन्स, पॅरोट ग्रीन, ब्लड रेड, मोरपंखी, बेबी पिंक, पर्पल अशा आकर्षक रंगांमध्ये हे स्वेटर्स मिळत असल्याने थंडी नसली तरी खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. वुलन, कॉटन आणि लिनन यांपासून हे स्वेटर्स बनविले जात असल्याने याचे वजन तर कमीच असते, परंतु हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण तर उन्हाळ्यात कूल वाटतात, असे फॅशन डिझायनर माधुरी शेळकेढ हिने सांगितले.काही वर्षांपूर्वी थंडीचे कपडे म्हटले की टिपिकल स्वेटर्स, शाली आणि मफलर मिळायचे. त्यांचे रंगातील वैविध्य सोडले तर फारशी व्हरायटी नसायची. म्हणजे रंग कुठलाही असू दे स्वेटर हे स्वेटरसारखं दिसायचं. उबदार कपड्यांच्या, लोकरीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्सची चलती आहे. टी-शर्टस अशा अनेक प्रकारांत विंटरसाठी डिझाइन केलेले कपडे मिळू लागल्याने तरुणांना पूर्वी स्वेटर्स ज्या पॅटर्नमध्ये मिळायचे त्यात उपयुक्तता होती; पण स्टाईल मात्र नव्हती. परंतु आता स्टड्ढेप्स, बॉर्डर किंवा तत्सम डिझाइन्स असलेले चार-पाच रंगांत विणलेले स्वेटर्स कम पूल ओव्हर, झिपर जीन्सवर घालणं हा तर सध्या फण्डा बनला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणारे मफलर्स, जाडजूड स्वेटर्स आता आऊटडेटेड झालेअसून, मफलरसारखे दिसणारे स्कार्फ, स्टोल्सना मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशा या लोकरीच्या कपड्यांना फॅशन टच येऊ लागल्याने या कपड्यांची चलती आहेच. त्यात सध्या थंडीची सुरु वात झाल्याने वुलन कपड्यांना प्रचंड मागणी आहे. लोकरीच्या स्वेटर्सचे ओझे खूप असते. त्यामुळे आॅफीस किंवा कॉलेजला जाताना ते सांभाळणे खूपच त्रासदायक ठरते. आता लाइट वेट स्वेटर्समुळे लूकच बदलल्यामुळे व त्याचे ओझेही वाटत नसल्यामुळे तरु णाईचा कल लाइट वेट स्वेटर्सकडेच असल्याचे वाशीतील विक्रेता भरत शहा याने सांगितले. हे स्वेटर ७०० रु पयांपासून ते अगदी ३ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.