शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याच्या नियुक्तीविरोधात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:20 IST

भरती प्रक्रियेवेळी पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना डावलून चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सेवेत दाखल करून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या अग्निशमन विभागात भरती झालेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात अग्निशमन कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भरती प्रक्रियेवेळी पात्र ठरलेल्या तीन उमेदवारांना डावलून चौथ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सेवेत दाखल करून घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल न घेतली गेल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.महापालिकेच्या अग्निशमन विभागात विभागीय अग्निशमन अधिकारी पदासाठी गतवर्षी भरती झाली होती. खुल्या आरक्षण गटातून ही भरती झाली होती. यावेळी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांपैकी चौथ्या क्रमांकाच्या पुरुषोत्तम जाधव यांना नियुक्त करण्यात आले. त्यापूर्वी जाधव हे एमआयडीसीच्या अग्निशमन दलात कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या बढतीच्या आधारे पालिकेत त्याच बरोबरीच्या पदावर घेण्यात आले. मात्र, त्यांना खालच्या पदावरील कामाचा अनुभव नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे अग्निशमन कर्मचारी युनियनचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनाच आपत्कालीन प्रसंगातील कामाचा अनुभव नसल्यास एखाद्या दुर्घटनेच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते, अशीही भीती कर्मचाऱ्यांना आहे, शिवाय जाधव यांनी पदभार स्वीकारताच कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर जोर दिल्याचाही कामगारांचा आरोप आहे. यामुळे त्यांच्या भरतीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी वर्षभर सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी जाधव यांच्या भरतीच्या विरोधात याचिका केली असून, न्यायालयाने जनहितार्थ ती दाखल करून घेतली आहे. यामुळे प्रशासनाकडून वशिल्याने भरती केल्या जात असल्याची शंका उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चर्चा करण्यास नकार दिला.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका