शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कारखाली चिरडून व्यक्तीचा मृत्यू

By admin | Updated: May 2, 2017 03:25 IST

चालत्या दुचाकीवरून पडल्याने पाठीमागून येणाऱ्या कारखाली चिरडून व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची घटना रविवारी रात्री वाशी खाडीपुलावर

नवी मुंबई : चालत्या दुचाकीवरून पडल्याने पाठीमागून येणाऱ्या कारखाली चिरडून व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची घटना रविवारी रात्री वाशी खाडीपुलावर घडली. सदर घटनेनंतर कारचालकाने कारसह घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर भरधाव वेगात कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळे दुचाकीचालकाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे.कादर उर्फ दाजू कुजदुनकर (४३) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते चिता कॅम्प, ट्राँबे येथे राहणारे आहेत. रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वाशी खाडीपुलावर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ट्राँबे येथे राहणाऱ्या शागुल अहमद याच्यासोबत अ‍ॅक्टिवा दुचाकीवरून ते वाशीच्या दिशेने येत होते. या वेळी शागुल दुचाकी चालवत होता, तर कादर हे पाठीमागे बसले होते. ते खाडीपुलावर आले असता, तोल सुटल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात घडला. या अपघातामध्ये दोघेही रस्त्यावर पडले असताना पाठीमागून आलेली भरधाव कार कादर उर्फ कुजदुनकर यांच्या अंगावरून गेली. त्यामुळे कारखाली चिरडून कादर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाहून भयभीत झालेल्या शागुल याने घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर त्या कारचालकानेही कारसह घटनास्थळावरून पळ काढला. अखेर एका कारचालकाने पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन करून खाडीपुलावर एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. तर रस्त्यावर छिन्न-विछिन्न अवस्थेत पडलेल्या या मृतदेहामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाशी पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो पालिका रुग्णालयात पाठवला. त्यानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली; परंतु रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.