शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या बँक खात्यातून रक्कम लुटणाऱ्याला अटक; सिम स्वॅप सुविधेचा गैरफायदा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 4, 2023 21:04 IST

फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई: फार्म कंपनीच्या बँक खात्यातून १८ लह ७४ हजार लुटणाऱ्या एकाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगालमधून त्याला अटक करण्यात आली असून त्याने सिम स्वॅप करून गुन्हा केल्याचे उघड झाले. एअरटेल कंपनीशी संबंधित असलेल्या एका फार्मा कंपनीसोबत हि ऑनलाईन फसवणूक झाली होती. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एरटेल कंपनीने या फार्मा कंपनीला व्यवहारासाठी कॉर्पोरेट लॉगिन दिले होते. 

अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीररीत्या हे लॉगिन करून फार्मा कंपनीच्या खात्यातून १८ लाख ७४ हजार रुपये चोरले होते. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक आयुक्त विशाल नेहूल, वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी उपनिरीक्षक रोहित बंडगर, रविराज कांबळे, भाऊसाहेब फटांगरे, सचिन पावशे, पूनम गडगे यांचे पथक केले होते. त्यानुसार पूनम गडगे यांनी तांत्रिक तपास करून संबंधित खाते हे पश्चिम बंगालमध्ये वापरले असून त्या खातेधारकाची माहिती मिळवली. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये धडक देऊन नूर इस्लाम सॅनफुई (२१) याला अटक केली आहे. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत सिम स्वॅप करून गुन्हा केल्याचे सांगितले. फार्मा कंपनीच्या खातेधारकाचा मोबाईल क्रमांक त्याने सिम स्वॅप करून स्वतकडे मिळवला होता. सदर सिम स्वॅप झाल्याचा मॅसेज खातेधारकाला आला असतानाही त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे त्यांचे सिमकार्ड बंद होऊन नूर याच्याकडे असलेल्या सिमवर तो नंबर सुरु झाला होता. त्याद्वारे त्याने बँक खात्याचे अधिकार मिळवून ऑनलाईन रक्कम हडपली होती. त्याने इतरही अनेकांना अशा पद्धतीने गंडा घातल्याची शक्यता असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई