शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 26, 2015 01:04 IST

गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

कळंबोली : गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीत सातत्याने पाणीटंचाईची भेडसावत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कळंबोली वसाहतीची लोकसंख्या ही दोन लाखांच्या आसपास पोहचली असून वसाहतीला ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सिडकोकडे नवीन पनवेल व कळंबोली नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता कोणतीच सोय नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून ते रहिवाशांना पुरवले जाते. एमजेपी पाताळगंगा नदीतून पाणी उचलून ते भोकरपाडा येथे शुध्द करते आणि त्या ठिकाणाहून जलवाहिन्यांव्दारे सिडको, पनवेल नगरपालिका आणि जेएनपीटीला पाणी दिले जाते. मात्र या वाहिन्या अतिशय जुनाट झाल्या असल्याने त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे जवळपास २५ टक्के पाण्याची गळती होत आहे.वाहिन्या दुरूस्त करण्याकरिता वारंवार शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे सिडको वसाहतींना पाणी टंचाईला वारंवार सामोरे जावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून २० ते २२ एमएलडी पेक्षा जास्त पाणी कळंबोलीला मिळत नाही. त्यामुळे या वसाहतीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवासी सिडको कार्यालयावर मोर्चे घेऊन येतात. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम, तालुका प्रमुख वासुदेव घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धडक दिली. यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाण्याचा अपव्यय कमी करून बाहेर जाणारे टँकर बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)