शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीवर शेकाप आघाडीचा झेंडा

By admin | Updated: November 15, 2016 04:52 IST

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने विजय मिळवला आहे. निवडणुकीत १७ च्या १७ जागांवर आघाडीचे

मयूर तांबडे / पनवेलपनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने विजय मिळवला आहे. निवडणुकीत १७ च्या १७ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून भाजपाला एकाही जागेवर विजय मिळविता आलेला नाही. आघाडीचे उमेदवार निवडून आल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी आतषबाजी करताना शेकाप आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी पार पडली. ग्रामपंचायत विभागातील ४, व्यापारी/अडते यांच्यामधून २ आणि हमाल/मापाडी यांच्यामधून १ अशा ७ उमेदवारांच्या निवडीसाठी सरस्वती विद्यामंदिर येथे मतदान घेण्यात आले. शेकाप आघाडी व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दहा जागांवर शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ७ जागांसाठी १६२४ मतदारांपैकी १४६९ मतदारांनी मतदान केले. या ७ जागांचा निकाल सोमवारी सकाळी १० वाजता सरस्वती विद्यामंदिर या शाळेमध्ये लागला. यात कोणता पक्ष बाजी मारतोय, हे पहाण्यासाठी नागरिकांनी शिवाजी सर्कल येथे मोठी गर्दी केली होती. यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. ७ पैकी ७ जागांवर शेकाप आघाडीने बाजी मारत भाजपाचा धुव्वा उडवला.निवडणूक अधिकारी चेतन चौधरी यांनी निकाल घोषित करताच शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यामध्ये शेकापने एकूण १५ जागा, काँग्रेस १ तर शिवसेनेने १ जागेवर विजय मिळवला.ग्रामपंचायत विभागातून सुनील दुकल्या सोनावळे (४९५ मते), राजेंद्र महादेव पाटील (४८३), प्रकाश पाटील (४७०), रुपेश प्रकाश पाटील (५०५) हे विजयी झाले. तर हमाल/मापाडी यांच्यामधून हरिश्चंद्र कारभारी म्हस्के (७० मते) मिळवून विजयी झाले. व्यापारी /अडते यांच्यामधून रमाकांत हशा गरु डे (४६५ मते), आणि सुरेश नारायण भोईर (३९७ मते) हे विजयी झाले. तर संतोष पाटील, सुरेश नाईक, रमाकांत दाभने, दत्तात्रेय पाटील, मोहन कडू, महादू गायकर, राम भोईर, संतोष के.पाटील, मेघा म्हसकर, प्रज्योती म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फटका भाजपाला या निवडणुकीत बसल्याची चर्चा पनवेलमध्ये आहे.