नवी मुंबई : विविध गृहप्रकल्पातील घरांसाठी सिडकोने सोडत काढली होती. या सोडतीत यशस्वी अर्जदारांनी निर्धारित वेळेत पैशांचा भरणा न केल्याने त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३० एप्रिल रोजी संपत असल्याने अर्जदारांच्या सोयीसाठी ही मुदत २ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.सिडकोने विविध उत्पन्न गटातील घटकांसाठी स्वप्नपूर्ती, वास्तुविहार/सेलिब्रेशन, व्हॅलिशिल्प, सीवूड्स इस्टेट आणि उन्नती हे गृहप्रकल्प उभारले आहेत. घरांसाठी वाटपपत्र प्राप्त झालेल्या अर्जदारांनी तीन महिन्यांच्या आत सदनिकेच्या किमतीची रक्कम भरणे आवश्यक होते. परंतु अनेकांनी या मुदतीत या रकमेचा भरणा केला नव्हता. त्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती ग्राहकांनी केली होती. (प्रतिनिधी)
पैसे भरण्याची मुदत २ मेपर्यंत
By admin | Updated: April 28, 2017 03:33 IST