शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांनी घेतला रस्त्यांचाच बळी

By admin | Updated: March 23, 2016 02:18 IST

कामोठे वसाहतीतील रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. आता तर ठिकठिकाणी खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोरजीच्या वाहिन्या टाकण्याकरिता

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीकामोठे वसाहतीतील रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. आता तर ठिकठिकाणी खाजगी मोबाइल कंपन्यांकडून फोरजीच्या वाहिन्या टाकण्याकरिता अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून नागरिकांचीही गैरसोय होत आहे. सिडकोने इमारतीच्या बांधकामांना परवानगी देताना रस्त्यांचा विकास केला नव्हता. रहिवाशांनी वारंवार आवाज उठवल्यानंतर सिडकोने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी रस्ते विकसित केले. पनवेल-सायन महामार्ग ते मानसरोवर या दरम्यान मुख्य रस्ता आहे. याठिकाणी सिडकोने दुभाजक विकसित केले. त्यात पाम आणि इतर झाडे लावली असली तरी बॅनर्स आणि फलकांमुळे रस्त्यांच्या सौंदर्यात बाधा येत आहे. सेक्टर १६ मधील विघ्नहर्ता सोसायटीसमोरील रस्ता खोदण्यात आलेला आहे. या ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने रस्त्याच्या मधोमध छेद घेण्यात आला आहे. मात्र खड्डा न बुजविल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रिध्दी सिध्दी हेरिटेझ सेक्टर-१४ या ठिकाणी केबल टाकण्याकरिता रस्ता उखडण्यात आला होता. तो बुजविण्यात आला असला तरी उर्वरित डेब्रिज न उचलल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. सेक्टर ११ मधील स्वस्तिक प्लाझासमोरील चौक चेंबरकरिता खोदकाम करण्यात आले होते. त्या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावर माती पसरली आहे. सेक्टर १६ येथे सुध्दा रस्त्यावर खोदकाम झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्मा पॅराडाईज सेक्टर २० इमारतीतील सांडपाणी वाहून नेण्याकरिता जोडणी करण्याचे काम सुरू आहे. याकरिता रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सेक्टर-१६ येथे हावरे निर्मितीसमोर पाइपलाइनसाठी मोठे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. कामोठेत विविध खाजगी मोबाइल कंपन्यांनी फोरजी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले आहे. याकरिता सिडकोकडे कंपन्यांनी परवानगी घेतली आहे. मात्र जास्त अंतर केबल टाकली जाते त्या तुलनेत परवानगी कमी क्षेत्रफळाची घेतली जाते. फोरजी, थ्रीजी, जल आणि मलनि:सारण वाहिन्या टाकण्याकरिता परवानगी घेतली असली तरी ते ओबडधोबड काम करतात. त्यांनी रस्त्यांना कमीत कमी डॅमेज करण्याकरिता सूचना दिल्या जातील, त्याचबरोबर कामोठे वसाहतीतील रस्ते सुस्थितीत आणण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत.- विलास बनकर, कार्यकारी अभियंता, कामोठे नोड, सिडको