शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबापासून दूर राहात वाशीतील कोविड सेंटरमध्ये रुग्ण, डाॅक्टरांची दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:45 IST

नवी मुंबईतील १२० कोरोनाबाधित;  एकमेकांना धीर देत साजरा केला उत्सव

 

n  सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनामुळे यंदा प्रथमच अनेकांना कुटुंबापासून दूर दिवाळी साजरी करावी लागली. त्यात बाधित रुग्णांसह त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. वाशीतील कोविड सेंटरमध्ये या सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी केली.शहरवासीयांनी पुरेपूर खबरदारी घेत यंदाची दिवाळी साजरी केली. मात्र शहरातील सुमारे १२० जणांना यंदाची दिवाळी कुटुंबापासून लांबच साजरी करावी लागली. ऐन दिवाळीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने पालिकेच्या वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्र येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे यंदा ना ओवाळणी झाली, ना अभ्यंग स्नान, ना सहकुटुंब फराळाचा आनंद घेता आला. मात्र जरी कुटुंबापासून दूर असले तरीही त्यांनाही दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न पालिकेतर्फे झाला. याकरिता वाशीतील कोविड सेंटरमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून रांगोळी काढण्यात आली होती. या वेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांच्यातले नैराश्य दूर केले. तर काहींनी फोनवर, व्हिडीओ कॉलवर बोलून आपली दिवाळी सहकुटुंब साजरी केली. 

दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला होणारी ओवाळणी पहिल्यांदाच चुकली असल्याची भावना उपचार घेत असलेल्या व्यक्तीने व्यक्त केली. यादरम्यान कुटुंबाची आठवण येत असल्याने फोनवर बोलून तो क्षण आनंदात साजरा केला. मात्र कुटुंबाला प्रत्यक्ष भेटता न आल्याची खंत होती. 

 कोविड सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांना एकटेपणा वाटू नये या भावनेतून डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. यासाठी केंद्रात रोषणाई करून घरच्यासारखी वातावरणनिर्मिती केली होती.    डॉ. वसंत माने, वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या