शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमध्ये पथ‘दिव्यांखाली’ अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:19 IST

तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे

नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. पथदिवे बंद असल्याने त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गुन्हेगारी घटना घडत आहेत.पालिकेच्या विद्युत विभागाच्या नाकर्तेपणामुळे तुर्भेत ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-महापे मार्गावर, तसेच इंदिरानगर ते बगाडे कंपनी दरम्यान पादचाºयांना ही समस्या भेडसावत आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झालेला असून, काही ठिकाणचे दिवेच नादुरुस्त स्थितीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातले हे महत्त्वाचे मार्ग असल्यामुळे दिवस-रात्र त्यावर रहदारी सुरू असते. शिवाय, अनेक चाकरमानी पायी या मार्गाचा वापर करत असतात; परंतु पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांची गैरसोय होत आहे. अंधाराचा आधार घेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती पादचाºयांना लुटत आहेत. तर भरधाव वाहनांकडून पादचाºयांना धडक लागून अपघाताचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सदर मार्गावरील पथदिवे सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिकेच्या विद्युत विभागाला दिले असून, दिव्याखालचा अंधार दूर करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये सुधार घडत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. परिणामी भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे कोठीवाले यांचे म्हणणे आहे.