शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
3
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
4
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
5
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
6
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
7
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
8
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
9
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
10
सारखा भाऊच का? रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा...
11
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
12
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
13
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
14
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
15
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
16
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
17
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
18
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
19
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
20
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!

पनवेलसाठी पाताळगंगाचे वाढीव पाणी

By admin | Updated: April 19, 2016 02:35 IST

शहरातील एमजेपीच्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. मात्र आता दुरुस्तीऐवजी या जुनाट जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय एमजेपीने घेतला आहे.

प्रशांत शेडगे,  पनवेलशहरातील एमजेपीच्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होते. मात्र आता दुरुस्तीऐवजी या जुनाट जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय एमजेपीने घेतला आहे. त्याचबरोबर प्राधिकरणाला पाताळगंगा नदीतून आणखी वाढीव पाणी उचलता येणार आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाबरोबर करारही झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीटंचाई कमी होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाताळगंगा नदीपात्रातून घेण्यात येणारे पाणी भोकरपाडा येथील जलशुध्दीकरणकेंद्रात शुध्द करण्यात येते. त्या ठिकाणाहून जलवाहिनीतून ते पनवेल नगरपालिका, जेएनपीटी, सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या गावांना पुरवले जाते. या वाहिन्या जुनाट व जीर्ण झाल्याने त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे या जीर्ण वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव एमजेपीकडे आहे. जलवाहिन्या बदलण्यासाठी पनवेल नगरपालिका ३० कोटींचा आर्थिक हातभार लावणार आहे. बदल्यात प्राधिकरणाकडून पनवेल शहराकरिता २० एमएलडी पाणी आरक्षित ठेवणार आहे. अमृत योजनेंतर्गत पालिकेला मिळणाऱ्या निधीतून हे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये सुध्दा प्रशासनाने तरतूद केली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिन्या बदलण्याकरिता १९६ कोटींचा आराखडा तयार केला आहे. याकरिता सिडको १४४, जेएनपीटीचा ४६ कोटींचा आर्थिक सहभाग असेल. यासंदर्भात करारनामा सुध्दा झाला असून हा करारनामा प्राधिकरणाने सिडकोला सादर केला आहे. मात्र काही तांत्रिक त्रुटी असून त्या सुधारण्याचेप्रयत्न एमजेपी करीत आहे. लवकरच करारनामा पूर्ण होऊन सिडकोकडून पैसे वर्ग केले जाणार असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. तीनही यंत्रणा सकारात्मक असल्याने एमजेपीच्या नूतन पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. एमजेपीच्या जुनाट वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने वारंवार शटडाऊन घ्यावा लागतो. नवीन वाहिन्यामुळे शटडाऊनची गरज भासणार नाही, त्यामुळे नियमित पाणीपुरवठा होईल.