शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाने काढली प्रशासनाची लक्तरे; घाणीतच ठिय्या मांडून आंदोलन

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 3, 2023 16:10 IST

रस्त्यावरील अस्वचतेची तक्रार करूनही दुर्लक्ष, प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली 

नवी मुंबई : बस थांब्याच्या समोरच रस्त्यावर साचलेल्या घाणीमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने प्रवास्याने चक्क घाणीतच बसून आंदोलन पुकारले. सायन पनवेल मार्गावरील वाशी येथील बस थांब्यावर गुरुवारी दुपारी संतप्त प्रवास्याने हा प्रकार केला. त्याठिकाणी साचलेल्या घाणीमुळे प्रवास्यांना होत असलेल्या त्रासातून सुटकेसाठी त्यांनी हे आंदोलन केले. 

नवी मुंबईत स्वच्छता अभियान राबवले जात असले तरीही अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यात सायन पनवेल मार्गाचाही समावेश आहे. अशाच प्रकारातून सायन पनवेल मार्गावर वाशी येथील एसटीच्या थांब्यासमोरच मोठ्या प्रमाणात घाण साचली होती. यामुळे वाशी येथून बसने प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना या घाणीला सामोरे जावे लागत आहे. त्यात डासांची पैदास होऊन आरोग्याला देखील धोका निर्माण होत आहे.

तीन दिवसांपूर्वी घणसोली येथील रहिवाशी जयवंत निकम हे सातारा येथे जाण्यासाठी बस थांब्यावर आले असता त्यांना तिथल्या घाणीचा त्रास झाला. यामुळे त्यांनी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयात तक्रार केली असता त्यांनी तिथला गाळ एकत्र करून रस्त्यावरच त्याचा ढिगारे लावले. तर घाणीचे हे ढिगारे उचलण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे गुरुवारी निकम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता त्यांना रस्त्यावरील घाण काढण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही प्रशासनाकडून स्वच्छतेच्या कामात होत असलेल्या टोलवाटोलवीला कंटाळून निकम यांनी अखेर घाणीच्या ढिगाऱ्यावरच बसून दोन्ही प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच संपूर्ण दिवसभर ढिगाऱ्यावर बसून त्यांनी आंदोलन केले. यानंतर देखील प्रशासनाने तिथले घाणीचे ढिगारे न हटवल्यास शुक्रवारी स्वखर्चाने आपण ते हटवू असा इशारा देऊन प्रशासनाची लक्तरे काढली.