शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

साथींचा ‘ताप’

By admin | Updated: July 31, 2015 00:14 IST

शहरात हिवताप, डेंग्यूने डोके वर काढले आहे. महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या महिनाभरात डेंग्यूचे २६ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी २ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे.

- प्राची सोनवणे, नवी मुंबईशहरात हिवताप, डेंग्यूने डोके वर काढले आहे. महानगरपालिका रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. या महिनाभरात डेंग्यूचे २६ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी २ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान ७३,९७७ रुग्णांचे रक्त तपासणीसाठी आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या तीन आठवड्यांमध्ये १४,०७० रुग्णांचे रक्त तपासणीसाठी आले आहे. जानेवारी ते जुलै दरम्यान हिवतापाचे ११६ तर गेल्या तीन आठवड्यांमध्ये हिवतापाचे ३२ रुग्ण आढळले.नवी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रुग्णांच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील करावे, घणसोली गावांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिकेच्या वतीने २४ जुलैपासून ‘डास उत्पत्ती शोध मोहिम’ हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती शहर हिवताप अधिकारी डॉ. उज्ज्वला ओतुरकर यांनी दिली. मोहिमेअंतर्गत आठवडाभरात ४५, १६० घरांमध्ये डास उत्पत्तीच्या जागा शोधण्यात आल्या. त्यापैकी १९९ घरांमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आहे. तेथील डासांच्या अळ््या, साचलेले पाणी नष्ट करण्यात आले आहे. रक्ताच्या चाचण्यांमध्ये एनएस-१ आढळल्यास घाबरून जायची गरज नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. रुग्ण संशोधन कारवाईअंतर्गत रुग्णांच्या घरी जाऊन डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. परिसरात पावडर फवारणी तसेच धुरीकरण केले जात आहे. रोगांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला जातो.- डॉ. उज्ज्वला ओतूरकर, शहर हिवताप अधिकारी