शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्समधील पार्ट्यांवर महसूलची नजर

By admin | Updated: December 30, 2016 04:25 IST

नववर्षाचे स्वागत धुंदीऐवजी शुध्दीत केले जावे, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायांवर

नवी मुंबई : नववर्षाचे स्वागत धुंदीऐवजी शुध्दीत केले जावे, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात ठिकठिकाणी दोन दिवस नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवायांवर भर दिला जाणार आहे. पोलिसांसह महसूल विभागाचेही हॉटेलमधील पार्ट्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. जनजागृतीच्या उद्देशाने वाशीतील शिवाजी चौकात ३० व ३१ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले असून अनेकांनी थर्टी फर्स्टचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील हॉटेल्स, सोसायट्या यासह इतर अनेक ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्ट्या रंगणार आहेत. मात्र नववर्षाच्या स्वागतपार्ट्या होत असताना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता नवी मुंबई पोलीस देखील सज्ज झाले आहेत. त्यासाठी ३० व ३१ डिसेंबर असे दोन दिवस शहरात कडेकोट बंदोबस्त लावला जाणार आहे. महत्त्वाच्या मार्गांवर शहर पोलीस व वाहतूक पोलीस यांच्यामार्फत नाकाबंदी देखील लावली जाणार आहे. त्यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला जाणार आहे. तर पार्ट्यांच्या ठिकाणी नशेसाठी अमली पदार्थांचा वापर केला जावू नये, याकरिता भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून पार्टीच्या ठिकाणांचा शोध घेवून त्याठिकाणच्या गैरप्रकारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. याबरोबरच पोलीस ठाण्याअंतर्गत हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेवून पार्टीच्या आयोजनासंदर्भातल्या खबरदारीच्या आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. नववर्षाचे स्वागत होत असताना उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. अनेकदा मद्यपान केल्यानंतर काहींचे जुने वाद उफाळून येतात. यामुळे त्यांच्यात भांडण होवून हाणामारीची देखील शक्यता असते. असे झाल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. मद्यपान करून वाहन चालवल्याने अपघात होवून गंभीर दुर्घटनाही घडू शकते, शिवाय पार्टीच्या ठिकाणी पुरवण्यासाठी शहराबाहेरून मद्याचा देखील पुरवठा होवू शकतो. असे प्रकार टाळण्यासाठी नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची झाडाझडती घेतली जाणार आहे. शहरातील पामबीचवर वाहतूक पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्साहात, परंतु शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचा आनंद साजरा करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्या आहेत. त्यानंतरही कोणी नियमाचे उल्लंघन केल्यास, त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.काही वर्षांपासून नवी मुंबई पोलिसांकडून थर्टी फर्स्टच्या निमित्ताने बंदोबस्तासोबतच नागरिकांमध्ये जनजागृतीचाही प्रयत्न होत आहे. त्यानुसार थर्टी फर्स्टच्या निमित्ताने वाशीतील शिवाजी चौकात दोन दिवसीय जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्याठिकाणी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने नागरिकांना व्यसनमुक्त आनंद साजरा करण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)पार्ट्यांमध्ये भेसळयुक्त दारूचा वापराची शक्यताहॉटेलमध्ये रंगणाऱ्या पार्ट्यांमध्ये महसूलची नजर चुकवून छुप्या पध्दतीने दारू आणली जावू शकते. त्याशिवाय पार्ट्यांसाठी भेसळयुक्त दारूचाही वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांसह महसूल विभागाचे देखील हॉटेलमधील पार्ट्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. तळीरामांची होणार धरपकडप्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना पुढील दोन दिवस कसोटीचे ठरणार आहेत. मद्यपान करायचे असल्यास त्यांना सोबत चालक हा सक्तीने बाळगावाच लागणार आहे, अन्यथा ठिकठिकाणच्या नाकाबंदीत त्यांचा सामना पोलिसांशी झाल्यास कारवाई होणे निश्चितच आहे. पोलिसांची कोणी नजर चुकवू नये, याकरिता प्रत्येक महत्त्वाच्या व आडोशाच्या मार्गावर पुढील दोन दिवस पोलिसांची नाकाबंदी असणार आहे.नववर्ष स्वागतासाठी रायगडवारी1राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ,नवी मुंबईच्या वतीने सरत्या वर्षाला निरोप देण्याकरिता, तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड येथे रायगडवारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दुर्गभ्रमंती आणि रविवारी पहाटे विशेष सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. 2व्यसनांपासून दूर राहत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. याठिकाणी शिवसंत व शिवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यांतर्गत महाराजांच्या समाधी मंदिराचा अभिषेक, पाचाड येथील जिजाऊ आऊसाहेबांच्या समाधीचा अभिषेक पाहण्याची संधी मिळणार आहे. रिसॉर्ट, फार्महाऊसवर वाद्ये वाजविण्यास मनाई३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेल परिसरात असलेले फार्महाऊस, रिसॉर्टमध्ये मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यावेळी मोठमोठ्या आवाजात वाद्ये वाजविली जातात. परंतु हा परिसर इकोझोन असल्याने कोणत्याही परिस्थितीत कर्कश वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले आहे.आतापर्यंत एकाही रिसॉर्ट, फार्महाऊसमधून वाद्ये वाजविण्याच्या परवानगीसाठी अर्ज केलेला नाही. तसेच कोणालाही डीजे, लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात येणार नाही. याबाबतच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सर्व हॉटेल मालकांची बैठक घेऊन, अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, मद्यपान, महिला छेडछाड, वाढती गर्दी टाळण्याबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या, वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्याचे निलेवाड यांनी सांगितले.