शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रोडपालीतील बस टर्मिनलवर अवजड वाहनांचे पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:46 IST

सिडको, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : लाखो रुपये खर्चूनही टर्मिनल वापराविना

कळंबोली : रोडपाली येथे बांधण्यात आलेले बस टर्मिनल धूळखात पडून आहे. सिडको आणि एनएमएमटीतील समन्वयाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सिडकोने लाखो रुपये खर्च करूनही जागेचा वापर सुरू झालेला नाही. सध्या या ठिकाणी अवजड वाहने बेकायदेशीर उभी केली जात आहेत.

कळंबोली वसाहतीत सिडकोची परिवहन सेवा सुरू होती, तेव्हाच बस टर्मिनल बांधण्यात आले होते. करवली चौकाच्या जवळ असणारे बस टर्मिनल परिसरात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी बस वळवण्याकरिताही जागा मिळत नाही. त्यामुळे बसचालक, खासगी वाहनचालक, पादचारी, स्थानिक आणि एनएमएमटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होते. या बस थांब्याला पर्याय म्हणून सिडकोने पाच वर्षांपूर्वी डी-मार्टपासून काही मीटर अंतरावर नव्याने बस टर्मिनल उभारले. हे ठिकाण नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या रस्त्यावर असल्याने महत्त्व प्राप्त झालेले आहे.

सिडकोने लाखो रुपये खर्च करून टर्मिनल उभारले असले, तरी सध्यातरी या ठिकाणी एनएमएमटीची बस येत नाही. त्यामुळे या जागेवर अवजड वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जातात. हे बस टर्मिनल कधी सुरू होणार, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.बस टर्मिनल उभारताना सिडकोने या ठिकाणी स्वच्छतागृह बांधले. मात्र, वापराविना त्याचीही दुरवस्था झाली आहे.

रोडपालीतील बस टर्मिनलमध्ये अवजड वाहनांची बेकायदेशीर पार्किंग होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या संदर्भात वाहतूक विभागाकडून सिडकोला पत्रही देण्यात आले आहे. दोन दिवसांत कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल. - अंकुश खेडकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा कळंबोली

टॅग्स :Parkingपार्किंग