शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पार्किंग, मार्केटचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:08 IST

सिडकोची उदासीनता : आरक्षित भूखंडांचे हस्तांतर रखडल्याने नवी मुंबई महापालिका हतबल

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : शहरात सध्या अनधिकृत फेरीवाल्यांनी संख्या वाढली आहे. परिणामी पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. पार्र्किंगसाठी पुरेशा जागा नसल्याने महापालिका हतबल झाली आहे. विशेष म्हणजे, पार्किंग व मार्केटसह विविध सामाजिक प्रयोजनासाठी आरक्षित भूखंडांचे हस्तांतरण व्हावे, यासाठी महापालिकेने सिडकोकडे तगादा लावला आहे; परंतु सिडकोच्या उदासीनतेमुळे भूखंड हस्तांतरणाचा मुद्दा बारगळल्याने पार्किंग व मार्केटचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येस नियंत्रित करण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी शहराची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मालकीचा उपक्र म असलेल्या सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती करताना शहरातील नागरिकांना सामाजिक सुविधा देण्याच्या दृष्टीने विविध प्रयोजनांसाठी भूखंड आरक्षित ठेवले आहेत. १९९२ साली नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक भूखंड महापालिकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत; परंतु शहरात विविध प्रयोजनासाठी आरक्षित असलेले सुमारे ५९६ सामाजिक सुविधांचे भूखंड सिडकोकडे आहेत. शहरातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने सिडकोने महापालिकडे हस्तांतरित केलेल्या सामाजिक सुविधांचे भूखंड विविध कामांसाठी अपुरे पडू लागले आहेत. यासाठी सिडकोकडे असलेल्या भूखंडांची मागणी सातत्याने महापालिकडे करण्यात येत आहे; परंतु सिडको याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागल्या आहेत. शहरात मार्केट आणि वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

पार्किंगसाठी सिडकोकडून ५८ भूखंड महापालिकडे हस्तांतरित झाले असून, आणखी १५ भूखंडांची मागणी महापालिका सिडकोकडे करीत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरात वाहने पार्किंगची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सिडकोने अनेक गृहसंस्था निर्माण करताना वाहने पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही. शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांनाही साडेबारा टक्के भूखंडातील सामाजिक सुविधांसाठी राखून ठेवलेल्या सुमारे पावणेचार टक्के भूखंडांचेही वाटप झाले नाही, त्यामुळे शहरातील कॉलनी बरोबर गाव-गावठाण आणि झोपडपट्टी भागात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून रस्त्याच्या कडेला, मैदानांमध्ये वाहने उभी करावी लागत आहेत, त्यामुळे अपघात आणि वाहतूककोंडीच्या निर्माण होत आहे.च्भूखंडावर कचरासिडकोने विविध प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेल्या आणि महापालिकडे हस्तांतरित न केलेल्या भूखंडांवर डेब्रिज आणि कचरा मोठ्या प्रमाणावर पडला असून अनेक भूखंडांवर अतिक्र मण झाले आहे, तर काही भूखंडांवर अतिक्र मण होण्याची शक्यता आहे. शहरात मार्केटसाठी राखीव भूखंडांपैकी ८४ भूखंड सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाले असून, अद्याप ४० भूखंडांची मागणी महापालिका सिडकोकडे करीत आहे. मार्केटच्या समस्येमुळे शहर स्वच्छतेलाही बाधा पोहोचत आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बाजार मांडला जात आहे, त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना विविध समस्यांना सामना करावा लागत असून, वाहतूककोंडीच्या समस्याही निर्माण होत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका