शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

पोलीस आयुक्तालय परिसरात नो-पार्किंगमध्ये गाड्यांची पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:40 IST

बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते अग्रोळी गावाकडे जाणाºया मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहेत.

नवी मुंबई : बेलापूर येथील पोलीस आयुक्तालय मार्ग, तसेच अर्बन हाट ते अग्रोळी गावाकडे जाणा-या मार्गावरील नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे गाड्या उभ्या केल्या जात आहेत. नो पार्किंगची पाटी समोर लावली असतानाही वाहनचालक स्वत:च्या सोयीनुसार हव्या तिथे गाड्या उभ्या करण्याचे प्रकार पाहायला मिळतात. दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते.रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. उभ्या केलेल्या वाहनांमुळे रस्ता अडविला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणी उभ्या केलेल्या या वाहनांवर वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याने वाहनचालक बेफिकीरपणे नो पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करत असल्याचे दिसून येते. कामानिमित्त कोकण भवन, सिडको तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, बेलापूर कोर्टात येणारे प्रवासी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मार्ग तसेच अर्बन हाट येथून अग्रोलीकडे जाणाºया मार्गावर वाहने उभी करून पुढील कामासाठी जातात, त्यामुळे या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाई करूनही पुन्हा तीच परिस्थिती पाहायला मिळते. नो पार्किंग झोनमधील वाहनांवर रोजच कारवाई केली जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.अर्बन हाट परिसरात स्वतंत्र पार्किंगची सोय केलेली असूनही, अग्रोली तलावाच्या समोरील रस्त्यावर वाहने उभी केलेली पाहायला मिळतात. सीबीडी हायवे लगत असलेल्या अग्निशमन दलाच्या बाहेरील रस्त्यावरील अवैध पार्किंगमुळे प्रवासी हैरण झाले आहे. बेलापूर रेल्वेस्थानकालगत असलेल्या पे अ‍ॅण्ड पार्कचा वापर न करता, प्रवासी रिक्षातळाच्या शेजारी असलेल्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी केला जात आहे. या मार्गावरील पादचारी तसेच इतर प्रवाशांच्या मार्गात अडथळे येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या गाड्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. अर्बन हाट येथील प्रदर्शनाला भेट देणारे ग्राहकही अनेकदा मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या करत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पार्किंगमध्ये जागा उपलब्ध नसल्याने मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जातात. पार्किंगच्या बाबतीत शिस्त लावणे अधिक गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया किशोर ठाकरे या स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली.

टॅग्स :Parkingपार्किंगNavi Mumbaiनवी मुंबई